BJP manifesto: जीवन प्रतिष्ठा, गुणवत्ता आणि गुंतवणुकीतून रोजगार निर्मिती हे आमचे लक्ष्य-PM मोदी | पुढारी

BJP manifesto: जीवन प्रतिष्ठा, गुणवत्ता आणि गुंतवणुकीतून रोजगार निर्मिती हे आमचे लक्ष्य-PM मोदी

पुढारी ऑनलाईन डेस्क: आमचे लक्ष जीवनाची प्रतिष्ठा, जीवनाची गुणवत्ता आणि गुंतवणुकीद्वारे रोजगार निर्मिती यावर आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीसाठी ‘संकल्प पत्र’ नावाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यानंतर ते आज (दि.१४) भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (BJP manifesto)

पीएम मोदींनी भाजप मुख्यालयात 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे संकल्प पत्र जारी केले. यात तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब या चार घटकांना सामोरे ठेवले आहे. या चार घटकांच्या उन्नतीसाठी अनेक उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचा पंतप्रधान मोदींचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात रोडमॅप सादर केला आहे. भाजपच्या मुख्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर गृहमंत्री अमित शहा, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होते. (BJP manifesto)

BJP manifesto: भाजपच्या ‘संकल्प पत्रा’चे PM मोदींकडून स्पष्टीकरण

 • मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहील, पीएम मोदींनी दिली हमी दिली. तसेच गरिबांना दिले जाणारे अन्न पौष्टिक, समाधानकारक आणि परवडणारे असेल याची आम्ही खात्री करू, असे देखील पीएम मोदी यांनी भाजपच्या संकल्प पत्रातून स्पष्ट केले आहे.
 • ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणले जाईल. यामध्ये ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्ती, मग तो
 • गरीब, मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय, 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळणार आहे.
 • मुद्रा योजनेतून अनेक नवीन स्टार्ट्सअप सुरू करणार
 • गेल्या दहा वर्षांत सुमारे 10 कोटी महिला स्वयं-सहायता गटांशी जोडल्या गेल्या आहेत. आम्ही या बचत गटांना माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, किरकोळ आणि पर्यटन या क्षेत्रात प्रशिक्षण देण्याचे ठरवले आहे. या माध्यमातून ३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार
 • मुद्रा लोनची मर्यादा २० लाखांपर्यंत करणार
 • नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार
 • जनऔषध केंद्रावर ८० टक्के सूट देणार
 • पाईपमार्फत स्वस्त गॅस प्रत्येक घरोघरी पोहचवणार
 • नॅनो युरिया वापर वाढवण्यावर भर देणार
 • हायवे, रस्ते, एअरवे, वॉटरवे आधुनिक बनवणार
 • वाहन चालकांसाठी हायवेवर रेस्ट रून बनवणार
 • पर्यटन क्षेत्रासाठी विविध योजना आणणार
 • भारतात 6G तंत्रज्ञानावर काम सुरू
 • ‘वन नेशन वन इलेक्शन’चा विचार पुढे नेणार
 • समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम करणार
 • भाजपचा वारसा आणि विकासाच्या मंत्रावर विश्वास आहे. आम्ही जगभरात तिरुवल्लुवर सांस्कृतिक केंद्रे तयार करू. तामिळ ही जगातील सर्वात जुनी भाषा आपला अभिमान आहे. तमिळ भाषेची जागतिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करेल.
 • भारताला अन्न प्रक्रिया केंद्र बनवणार. यामुळे मूल्यवर्धन होईल, शेतकऱ्याचा नफा वाढेल आणि रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील.
 • देशातील सामाजिक, भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करणार
 • गेल्या 10 वर्षात आम्ही दिव्यांगांसाठी अनेक सुविधा दिल्या आहेत. पंतप्रधान आवास योजनेत आता दिव्यांग मित्रांना प्राधान्य दिले जाईल, त्यांना त्यांच्या विशेष गरजेनुसार घरे मिळावीत यासाठी विशेष काम केले जाणार आहे.

Back to top button