संजय राऊत यांना विशेष ‘पीएमएलए’ न्यायालयात हजर करणार
मुंबई : पुढारी वृत्तसेवा;
शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेऊन चौकशीअंती अटक करण्यात आली. सक्तवसुली संचालनालय (ईडी) त्यांना सोमवारी दुपारी विशेष पीएमएलए न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
राऊत हे वारंवार समन्स बजावून चौकशीला हजर राहिले नाहीत. म्हणून गुन्ह्याच्या अनुषंगाने राऊतांकडे चौकशी करायची आहे. मात्र ते तपासात सहकार्य करत नाहीत, असा दावा करत ईडी राऊतांच्या कोठडीची मागणी करणार असल्याची माहिती मिळते. त्यापूर्वी संजय राऊत यांची सर. जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.
गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकासात झालेला सुमारे ०१ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा आणि पंजाब अँड महाराष्ट्र बॅंक (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी मनी लॉंड्रिंग कायद्यान्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करुन ईडी तपास करत आहे. ईडीने रविवारी सकाळी सात वाजता संजय राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्यावर छापेमारी केली. तब्बल साडे नऊ तासांच्या कारवाईनंतर ईडीच्या पथकाने राऊत यांना ईडीच्या बेलार्ड पिअर येथील कार्यालयात आणले. येथे रात्री साडे बारा वाजेपर्यंत चौकशी केल्यानंतर ईडीने राऊतांना अटक केली आहे.
हेही वाचलंत का?
- काय ती गर्दी, काय ते डोंगर, ओक्केच..! सिंहगडावरील निसर्गसौंदर्याचा पर्यटकांनी लुटला आनंद
- मविप्र संस्थेची निवडणूक पारदर्शक घ्या ; आ. माणिक कोकाटे, अॅड. ठाकरे यांचे सहायक धर्मादाय आयुक्तांना साकडे
- धुळे : ईडीच्या विरोधात धुळे जिल्हा शिवसेना आक्रमक, रास्ता रोको करून कारवाईचा निषेध
- Thalipeeth : साबुदाण्याची खिचडी खायचा कंटाळा आलाय? मग साबुदाण्याचं कुरकुरीत थालीपीठ ट्राय करा

