

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मतदानाच्या वेळी बँक खात्यात पेटीएमद्वारे पैसे पाठविले जाण्यासाठी ही माहिती गोळा केली जात असल्याचे समजते. कोणाच्या तरी खात्यातून मतदारांच्या खात्यात काळा पैसा पाठविणे हे मनी लाँडरिंग आहे. मनी लाँडरिंगच्या प्रयत्नाची ईडीकडे तक्रार करणार असून चौकशीची मागणी करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली आहे.
राऊत म्हणाले की, सध्या कोल्हापुरात भाजीची पेंडी घ्यायला गेला तरी भाजपवाल्यांचे लक्ष आहे. तुम्ही चिकण घेतला तरी तुमचे त्यांच्यावर लक्ष आहे. कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांचे काही पदाधिकारी फिरत आहेत एखाद्या माणसाने किती चिकण घेतले त्यांने भाजी किती विकत घेतली. त्यामध्ये काही बदल दिसला तर ते ईडीची चौकशी लावणार म्हणतात. यावर कोल्हापुरातील जनतेने सतर्क राहून खरेदी करावी अशी मिश्किल टिप्पणी संजय राऊत यांनी केली.
दिल्लीत आम्ही सर्वजन एकत्र काम करत आहोत. आमच्या ह्रदयात सगळ्यांबद्दल प्रेम आहे. सध्या शिवसेनेचा जंनसंपर्क दौरा सुरू आहे यामध्ये शिवसेनेला सरकार म्हणून सामान्य शिवसैनिकांपर्यंत पोहोचावे लागेल. त्यासाठी शिवसेनेचे काही खासदार राज्यात व्यस्त आहेत. आम्ही जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी घराघरात पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे राऊत म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाच्या बांधणीसाठी तयारीला लागले आहेत.
पक्ष न पाहता महाविकास आघाडी म्हणून काम करायला हवे. तिन्ही पक्षांना एकत्र काम केल्यास सर्वांच्या समस्या सोडवण्यास मदत होणार आहे. आम्ही चहापानासाठी भाजपसह सर्वच जणांना बोलवले आहे पण कोण येईल ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पालकमंत्री कोणत्याही पक्षाचा असेल तरीही त्याला तिन्ही पक्षाचे काम करावे लागेल हा प्रत्येक पालकमंत्र्यांना आदेश आहे. महामंडळाच्या नियुक्त्या का रखडल्या आहेत त्यासाठी समिती नेमून पहावे लागेल.
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांना विरोध केला पण त्यांनी भाजपशासित राज्यातील भोंगे उतरवण्यासाठी पहिल्यांदा प्रयत्न करावे. त्या राज्यात विरोध असूनही भोंगे तसेच आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.
कोल्हापूर शहरात विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरोघर फिरून एका शिक्षणसंस्थेचे विद्यार्थी – विद्यार्थिनी मतदारांच्या बँक खात्यांची माहिती गोळा करत आहेत. मतदानाच्या वेळी बँक खात्यात पेटीएमद्वारे पैसे पाठविले जाण्यासाठी ही माहिती गोळा केली जात असल्याचे समजते. कोणाच्या तरी खात्यातून मतदारांच्या खात्यात काळा पैसा पाठविणे हे मनी लाँडरिंग आहे.
मनी लाँडरिंगच्या प्रयत्नाची ईडीकडे तक्रार करणार असून चौकशीची मागणी करणार आहे. शहरातील मतदारांनाही आपले आवाहन आहे की, थोड्या रकमेच्या मोहात पडून आपले बँक खात्याचे तपशील देऊ नये, पुढे ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याचा धोका आहे.