

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सतीश कौशिक यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसलाय. त्यांच्या जाण्याने बॉलिवूड इंटस्ट्रीवर शोककळा पसरली. सतीश कौशिक यांच्या पार्थिवावर अंत्ययंस्कारावेळी तमाम कलाकार पोहोचले. यावेळी सलमान खानदेखील उस्थित होता. सलमानने (Salman Khan) सतीश कौशिक यांच्यासोबत तेरे नाम आणि क्यूंकीमध्ये काम केले होते. तो अभिनेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचला. यावेळी सलमान खान कारमध्ये दिसला. त्यावेळी तो खूप भावूक झालेला दिसला. (Salman Khan)
सलमान खान सतीश कौशिक यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचला. यावेळचा एक व्हिडिओ सलमान खान एफसी ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आलाय. यामध्ये तो आपले अश्रू लपवताना दिसला.
सलमान खान कारमधून सतीश कौशिक यांच्या घरी पोहोचला. यावेळी खूप गर्दीदेखील होती. ज्यावेळी कॅमेरे सलमानकडे वळले, तेव्हा सलमान आपले अश्रू लपवताना दिसला. यावेळी त्याचे डोळे पाणावलेले दिसले.