Sachin Tendulkar : भोगवे किनार्‍यावर ‘क्रिकेटच्या देवाचा’ सुवर्णमहोत्सवी वाढदिवस

Sachin Tendulkar : भोगवे किनार्‍यावर ‘क्रिकेटच्या देवाचा’ सुवर्णमहोत्सवी वाढदिवस

Published on

परुळे; पुढारी वृत्तसेवा : ज्या क्रिकेटपटूचे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत, असा सुप्रसिद्ध क्रिकेटर म्हणजेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. जगभरातील क्रिकेटप्रेमींचा लाडका व जागतिक क्रिकेटचा देव मानला जाणार्‍या सचिन तेंडुलकरचे रविवारी सायंकाळी वेंगुर्ले तालुक्यातील परुळे-भोगवे सागर किनारी आगमन झाले. यावेळी त्याने भोगवे व किल्ले निवती सागर किनार्‍यावर पर्यटनांचा आनंद घेतला. दरम्यान, काही चाहत्यांना ज्याच्या सोबत फोटो सेशनची संधी मिळाल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. (Sachin Tendulkar)

सचिन तेंडुलकर यांचा 24 एप्रिल हा वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला वेंगुर्ले-भोगवे येथील सागर किनार्‍यावर सचिन तेंडुलकर हजर झाला. सोमवारी त्याने आपला 50 वा वाढदिवस काही मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत भोगवे येथे साजरा केला. दरम्यान, त्याने जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळांना भेट दिली. परुळे-भोगवे येथील हॉटेलमध्ये त्याचा मुक्काम आहे. किल्ले निवती सागर किनार्‍यावर त्याने आपल्या सहकार्‍यांसमवेत रविवारी संध्याकाळी फेरफटका मारला. यावेळी सर्वच क्रिकेटप्रेमींना त्याच्या दर्शनाने खूपच आनंद झाला. क्रिकेटनिमित्त आपले जगभर फिरणे झाले; परंतु भोगवे – निवतीसारखा सुंदर स्वच्छ सागर किनार्‍यावर फिरण्याचा आनंद विशेष असल्याचे सचिनने सांगितले. (Sachin Tendulkar)

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news