ICC World Cup SA vs NED : द. आफ्रिकेची आठवी विकेट, नेदरलँडचा भेदक मारा

ICC World Cup SA vs NED : द. आफ्रिकेची आठवी विकेट, नेदरलँडचा भेदक मारा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषकाच्या 15व्या सामन्यात नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला 246 धावांचे लक्ष्य दिले आहे. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 34 षटकांत 8 गडी गमावून 155 धावा केल्या आहेत.

द. आफ्रिकेने सात विकेट गमावल्या

दक्षिण आफ्रिकेने 145 धावांवर सात विकेट गमावल्या आहेत. डेव्हिड मिलर 52 चेंडूत 43 धावा करून बाद झाला. लोगान व्हॅन बीकने त्याला क्लीन बोल्ड केले.

द. आफ्रिकेची सहावी विकेट

109 धावांवर द. आफ्रिकेची सहावी विकेट पडली. मार्को यानसेन 25 चेंडूत नऊ धावा करून बाद झाला. व्हॅन मिकरेनने त्याला क्लीन बोल्ड केले.

द. आफ्रिकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला

दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ 89 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. हेन्रिक क्लासेन 28 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. व्हॅन बीकने त्याला विक्रमजीत सिंगकरवी झेलबाद केले.

द. आफ्रिकेची चौथी विकेट

246 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची चौथी विकेट 44 धावांवर पडली. यानंतर आफ्रिकन संघ अडचणीत सापडला.

द. आफ्रिकेच्या तीन विकेट

42 धावांवर दक्षिण आफ्रिकेची तिसरी विकेट पडली. एडेन मार्कराम तीन चेंडूत एक धाव करून बाद झाला. व्हॅन मिकरेनने त्याला क्लीन बोल्ड केले.

द. आफ्रिकेने दोन विकेट गमावल्या

दक्षिण आफ्रिकेची दुसरी विकेट 39 धावांवर पडली. टेंबा बावुमा 31 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. व्हॅन डर मर्वेने त्याला क्लीन बोल्ड केले.

द. आफ्रिकेची पहिली विकेट

246 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची पहिली विकेट 36 धावांवर पडली. क्विंटन डी कॉक 22 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. अकरमनने त्याला यष्टिरक्षक एडवर्ड्सकरवी झेलबाद केले.

पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात नेदरलँडची सुरुवात खराब झाली. निम्मा संघ 82 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर कर्णधार एडवर्ड्सने आर्यन दत्तसोबत 41 धावांची भागिदारी करत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. नेदरलँड्सकडून कर्णधार चार्ल्स एडवर्ड्सने नाबाद 78 धावांची शानदार खेळी केली. व्हॅन डर मर्वेने 29 आणि आर्यन दत्तने 9 चेंडूत 23 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, मार्को जॅनसेन आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. जेराल्ड कोएत्झी आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

४३ ओव्हरचा सामना

पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याला विलंब झाला. यामुळे पंचांनी सामना ४३९-४३ ओव्हरचा खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

सामन्यात पावसाचा व्यत्यय

धर्मशाला येथे खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे टॉसला विलंब झाला. पाऊस थांबल्यावर टॉस घेण्यात आला. यामध्ये द. आफ्रिकेने टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेकला. परंतु, यानंतर पावसाने पुन्हा मैदानात हजेरी लगावली. मैदानात पावसाची उघडझाप सुरू असल्याने ग्राऊंड स्टाफनी खेळपट्टी झाकून ठेवली आहे.

दोन्ही संघात बदल :

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने आपल्या प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सीच्या जागी वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झीचा संघात स्थान दिले आहे. त्याचबरोबर नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सनेही संघात बदल केला आहे. रायन क्लेनच्या बदली अष्टपैलू लोगान व्हॅन बीकला संघात स्थान दिले आहे. (SA vs NED)

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news