

कळंगुट / म्हापसा : पुढारी वृत्तसेवा; कळंगुट या गोव्याच्या जगप्रसिद्ध समुद्रकिनारी परिसरात रशियन पर्यटक (Russian tourist rape) महिलेवर गुरुवारी (१ डिसेंबर) रात्री बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी दोघा रूमबॉयना अटक केली आहे. शकील अन्सारी उर्फ सलमान झिरा जलाहा (वय २३) आणि सहीमुद्दीन अन्सारी अब्दुल अली जलाहा (वय २२) अशी संशयितांची नावे असून ते मुळचे नेपाळचे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित पीडिता ३७ वर्षांची आहे. ती एका हॉटेलमध्ये राहिलेली होती. याच हॉटेलमध्ये शकील अन्सारी उर्फ सलमान झिरा जलाहा आणि सहीमुद्दीन अन्सारी अब्दुल अली मुळचे नेपाळचे आहेत. दोघेही रूमबॉय म्हणून काम करतात.
पीडित रशियन युवती दि. १ रोजी गोव्यात आली असून ती कळंगुट येथील एका रिसॉर्टमध्ये उतरली होती. या रिसॉर्टमध्ये रूमबॉय म्हणून काम करणाऱ्या दोन्ही संशयितांनी तिच्या परवानगीशिवाय तिच्या खोलीत जबरदस्तीने प्रवेश करून बलात्कार केला. तशी तक्रार पीडितेने दिलेली आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रगती मळीक यांनी संशयितांना ताब्यात घेतले. तपास निरीक्षक दत्तगुरू सावंत,उपअधीक्षक विश्वेश कर्पे व उत्तर गोवा अधीक्षक निधीन वाल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. पोलिस कोठडीसाठी उद्या त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.
हेही वाचा