जालना : परतूर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींची निवडणूक; सरपंच पदासाठी २०८ उमेदवारी अर्ज | पुढारी

जालना : परतूर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींची निवडणूक; सरपंच पदासाठी २०८ उमेदवारी अर्ज

परतूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींची निवडणुकीत होत आहे. दि २८ नोहेंबर २०२२ पासून ग्रामपंचायत सदस्य आणि थेट जनतेतून सरपंच निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती.  शेवटच्या दिवशी इछुकांनी रात्री उशिरा पर्यंत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

सरपंच व सदस्य पदासाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इछुकांनी ऑनलाइन केंद्रावर मोठी रात्र दिवस गर्दी केली. शेवटच्या दिवशी निवडणूक विभागाने ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यासाठी मुभा देण्यात आली होती. अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी दि. २ डिसेंबर २०२२ शेवटची तारीख असल्याने इछुक उमेदवाराने रात्री नऊ वाजेपर्यंत तहसील कार्यालयात  उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होती. ४१ ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी २०८ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले तर ३३५ सदस्य पदासाठी ९६६  इछुकानी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवाराचे अर्ज छानणीकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button