

ओमिक्रॉन या नव्या विषाणूने संपूर्ण जगाला हादरवण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे कर्नाटक राज्यात कोरोनाची नवी मार्गसूची जारी करण्यात आली आहे. केरळ आणि महाराष्ट्रातून कर्नाटक मध्ये येणार्यांना आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल व कोरोनाच्या दोन डोसची सक्ती केली आहे. शिवाय शाळा-महाविद्यालयांतील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले असून विवाह सोहळ्यांमध्ये मास्कची सक्ती केली आहे.
केंद्र सरकारने याबाबत सूचना दिल्यानंतर कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी, तज्ज्ञांची तसेच मंत्रिमंडळाची बैठक झाली. यावेळी कोरोनावर नियंत्रणासाठी नवी मार्गसूची जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बंगळूर मनपासह बंगळूर शहर, धारवाड, मंगळूर, उडपी, चामराजनगर, कोडगू, म्हैसूर जिल्हाधिकार्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
महसूल मंत्री आर. अशोक यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, केरळ आणि महाराष्ट्रातून कर्नाटक मध्ये येणार्यांना आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवालाची सक्ती करण्यात आली आहे. गर्दी होणार्या सर्व कार्यक्रमांमध्ये मास्कची सक्ती असेल. कर्नाटकात नव्या विषाणूचे रुग्ण आढळले नाहीत. पण, त्याआधी खबरदारी घेण्यात येत आहे. महाविद्यालयांतील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले आहेत.
मार्गसूची