RRR ची घोडदौड सुरुच! हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशनमध्ये ३ पुरस्कारांचा मानकरी ठरला चित्रपट

RRR ची घोडदौड सुरुच! हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशनमध्ये ३ पुरस्कारांचा मानकरी ठरला चित्रपट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौलीचा आरआरआर चित्रपट यशाचे शिखर चढत आहे. आधी गोल्डन ग्लोब ॲवॉर्डमध्ये चित्रपटातील नाटू नाटू गाणे बेस्ट ओरिजिनल सॉन्ग म्हणून निवड झाली होती. ऑस्कर २०२३ च्या रेसमध्ये आरआरआर असून आतापर्यंत या चित्रपटाने इतिहास रचला आहे. दरम्यान, आरआरआरने हॉलीवूड क्रिटिक्स असोसिएशन ॲवॉर्ड्समध्येही आपला झेंडा फडकवला आहे. या चित्रपटाने वेगवेगळ्या विभागामध्ये तीन ॲवॉर्ड जिंकले आहेत.

एसएस राजामौलीचा सुपरहिट चित्रपट 'आरआरआर' ची क्रेज अद्यापही फॅन्सच्या मनातून कमी झालेली नाही. ॲक्शन आणि ड्रामाने भरपूर या चित्रपटाने जगभरात जबरदस्त कमाई केली होती. 'आरआरआर' २५ मार्च २०२२ मध्ये रिलीज करण्यात आला होता. रामचरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगन आणि आलिया भट्ट स्टारर हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. हा चित्रपट तिसऱ्या वार्षिक क्रिटिक्स च्वॉईस सुपर ॲवॉर्ड्स नॉमिनेशन झाल्याची घोषणा करण्यात आली.

साऊथ सुपरस्टार्स ज्युनिअर एनटीआर आणि राम चरणसोबत ब्रॅड पिटला 'बुलेट ट्रेन'साठी, टॉम क्रूजला टॉप गन मेवरिक' साठी आणि निकोलस केजला 'द अनबियरेबल वेट ऑफ मॅसिव टॅलेंट'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीमध्ये नामांकन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news