Rohit patil : ‘निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही’

Rohit patil : ‘निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवंगत माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील (Rohit patil) यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवली आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूक निकालाकडे राज्‍याचे लक्ष वेधले हाेते. या निवडणुकीचा प्रचारही तसा झाला होता.

 निवडणूक प्रचार काळात रोहित पाटील (Rohit patil ) यांच्यावर विरोधकांनी बाेचरी टीका केली हाेती. याला उत्तर देताना रोहित पाटील म्हणाले होते, "माझा बाप काढणाऱ्यांनो तुम्हाला निकालाच्‍या दिवशी माझ्या बापाची आठवण नक्की होईल. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत. आम्हाला सल्ले देणाऱ्यांनो, तुम्ही काय कामं केली ते सांगा " निवडणूक प्रचार काळात विराेधकांना दिलेले आव्‍हान रोहित पाटील यांनी खरे करुन दाखवले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या निवडणुकीत विरोधकांनी टीका करताना रोहित पाटील (Rohit patil ) यांच्यावर 'त्याला बाप आठवेल' अशी टीका केली होती. यामुळे ही निवडणूक राज्यात चर्चेची झाली होती. सर्वांचे लक्ष या निकालावर लागले होते. राहित पाटील यांच्या विरोधात विरोधक सगळे एकत्र आले होते. आता निकालानंतर रोहित पाटील यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली आहे. यात रोहित पाटील म्हणाले, निवडणुकीत विरोधकांनी माझा बाप काढला होता. मला बालिश ठरवलं, माझ्या बापाची पुण्याई म्हणाले; पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही"

माझं वयं २३ आहे, २५ होईपर्यंत विरोधकांच काहीच ठेवत नाही

२३ वर्षाच्या तरुणाविरुद्ध सर्वजण एकवटले आहेत? सध्‍या माझं वय २३ चं आहे, २५ होईपर्यंत विरोधकांकडे काहीच ठेवत नाही, असा इशाराही रोहित पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील विरोधकांना दिला होता. नगरपंचायत निवडणूक प्रचारातील रोहित पाटील ( Rohit patil )यांचे हे भाषण राज्यभर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

कवठेमहांकाळ नगरपंचायती निकाल असा

राष्ट्रवादी पॅनेल  १०
शेतकरी विकास पॅनल ६
अपक्ष १

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news