Babar Azam | बाबर आझमला बॅटिंग करताना कोणत्या गोष्टीची भिती वाटते?, गावस्करने सांगितले मोठे कारण

Babar Azam | बाबर आझमला बॅटिंग करताना कोणत्या गोष्टीची भिती वाटते?, गावस्करने सांगितले मोठे कारण
Published on
Updated on

नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याची गणती सध्या जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये केली जाते. बाबरला पाकिस्तान संघातील रन मशीन म्हणून ओळखले जाते. पण बाबर गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममधून जात आहे. तो गेल्या काही दिवसांपासून बचावात्मक पवित्रा घेऊन फलंदाजी करताना दिसत आहे. यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. आझमच्या खेळीवर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर रोहन गावस्कर (Rohan Gavaskar) याने मोठे वक्तव्य केले आहे. बाबर दमदार फलंदाज आहे. पण अनेकवेळा अपयशाच्या भीतीने तो बचावात्मक पवित्रा घेतो, असे रोहनने स्पोर्ट्स १८ या चॅनेलशी बोलताना म्हटले आहे.

"बाबर हा एक दर्जेदार खेळाडू आहे. पण तो बहुआयामी खेळाडू नाही. पण गियर बदलणे त्याला माहित आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डावातील नंबरवर नजर टाकली तर पहिल्या डावात त्याचा स्ट्राइक रेट सुमारे १२५ असतो. तर दुसऱ्या डावात तो १३७ असतो. यावरुन असे दिसून येते की त्याला गियर चेंज करणे माहित आहे." असे रोहन गावस्करने म्हटले आहे.

गावस्करने पुढे म्हटले आहे की मला वाटते हे एक मेंटल माइंडसेट आहे आणि जेव्हा मी अपयशाची भीती म्हणत आहे तेव्हा माझे मत चुकीचेही असू शकतो. बाबर जेव्हा पहिल्यांदा बॅटिंग करतो तेव्हा त्याला वाटते की त्याला क्रीजवर अधिक वेळ टिकून रहायला हवे. जर तो अयशस्वी ठरला तर संघाची फलंदाजी कोलमडेल आणि अनेकवेळा याचा परिणाम खेळाडूवर होतो.

बाबर आझमची (Babar Azam) फलंदाजी आशिया कपमध्ये फ्लॉप ठरली होती. आता टी२० विश्वचषकात त्याच्याकडून पाकिस्तान संघाला मोठ्या अपक्षा आहेत.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news