Rinku Rajguru : फ्लोरल प्रिंट साडीत आर्चीच्या अदा लईचं भारी

rinku rajguru
rinku rajguru
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेत्री रिंकू राजगुरुला पाहिल्यानंतर तिचं सौंदर्य आणखी खुलून जात असल्याचं दिसतयं. तिच्या एकापेक्षा एक फोटोंनी सर्वांच लक्ष तिने आपल्याकडे वेधून घेतलंय. कधी वेस्टर्न तर कधी जीन्समध्ये सर्व प्रकारच्या आऊटफिटमध्ये रिंकूचे कमालीचे सौंदर्य दिसते. आता थोड्या वेळापूर्वीच तिने आपले साडीतील काही फोटो शेअर केले आहेत, हे फोटो पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही की, सैराटच्या आर्चीमध्ये म्हणजेच रिंकूमध्ये इतका बदल झालाय.

रिंकू राजगुरु
रिंकू राजगुरु

तिने आपले साडीतील काही फोटो शेअर करत कॅप्शन लिहिलीय की- 'Magic happens when you start loving yourself'.
तिच्या या फोटोला नेटकऱ्यांनी खूप साऱ्या कमेंट्स दिल्या आहेत. काहींनी म्हटलंय- Gorgeous to the core ❤️❤️❤️❤️❤️❤️?????, Wow ?❤️ so beautiful looking you in saree beautiful ??❤, Osam ?????, ❤️❤️❤️❤️❤️❤️????, Big fan of you, Pretty archuuu❤️❤️❤️???, You are heaven to me❤️❤️, Sarees were made to worn by beauty's like you, Waa sridevi look ??.

रिंकू राजगुरु
रिंकू राजगुरु

समर लूक व्हायरल

चार दिवसांपूर्वी रिंकूने गॉगल घालत जीन्समध्ये एक फोटो शेअर केला होता. या फोटोला तिने कॅप्शन लिहिली होती की-
what time is it? summertime!? #summrvibes? . उन्हाळ्यातील रिंकूचे फोटो सर्वांना आकर्षित करत आहेत. सनकिस्ड हा फोटो पाहून रिंकूला नेटकऱ्यांकडून वाहव्वा मिळत आहे.

रिंकू राजगुरु
रिंकू राजगुरु

'सैराट'नंतर बदलला लूक

दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या 'सैराट' या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहे. या चित्रपटात ती आर्चीच्या भूमिकेत होती. चार-पाच दिवसांपूर्वी तिने साडीतील आणखी काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. ज्यामध्ये ती पांढर्‍या फुलांची प्रिंटेड साडी आणि गुलाबी रंगाचा ब्लाउज परिधान केलेल्या तिच्या बोल्ड स्टाईलमध्ये दिसली होती.

रिंकू राजगुरु
रिंकू राजगुरु

विशेष म्हणजे, तिचा सैराट चित्रपटानंतर लूक बदललाय. अनेक चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये विविध भूमिका साकारणाऱ्या रिंकूला त्या – त्या भूमिकेसाठी स्वत:च्या शरीरयष्टीमध्ये बदल करावा लागलाय. ज्यासाठी तिने खूप मेहनत घेतलेली दिसते. खूप कष्ट घेऊन तिने आपले वजन कमी केले आहे.

आता ती आठवा रंग प्रेमाचा या मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल.

रिंकू राजगुरु
रिंकू राजगुरु

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news