

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे निकटचे सहकारी आमदार प्रताप सरनाईक यांच्यामध्ये वाद झाल्याच्या वृत्ताने सर्वत्र खळबळ उडवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक हे खंद्दे समर्थक समजले जातात. दोघांचे मतदार संघ हे ठाण्यातील आहेत. या दोघात सलोख्याचे संबध असताना अचानक या दोघांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती सुत्रांकडून येत आहे. प्रताप सरनाईक यांचा ओवळा – माजीवाडा मतदारसंघावरुन दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहे.
आमदार प्रताप सरनाईक हे ओवळा – माजीवाडा मतदारसंघातून निवडूण येतात. या मतदारसंघावर प्रताप सरनाईक यांचे वर्चस्व आहे. दरम्यान हा मतदारसंघ आगामी निवडणुकीसाठी भाजपला सोडण्यात यावा अशी भाजपची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी आहे. या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखिल सहमत आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा अशीच इच्छा आहे की, ओवळा – माजीवाडा हा मतदारसंघ शिंदे गटाकडून भाजपच्या माजी आमदारांकरीता सोडला जावा. जेव्हा याबाबतची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांना समजली तेव्हा प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करुन जाब विचारला. तेव्हा फोन वरील संभाषणा दरम्यान दोघांच्या खडाजंगी झाली, दोघांमध्ये कडाक्याचे वाद झाले असल्याची माहिती सुत्रांमार्फत समजते आहे.
दरम्यान या वृत्ताबाबत दोघांच्या जवळच्या लोकांकडून असे काहीही घडले नसल्याचे सांगितले आहे. माध्यमांकडून खोडसाळपणाने हे वृत्त चालवले जात असल्याचे दोघांकडून सांगण्यात येत आहे. दोघांमध्ये चांगले संबध असून ते कायम सोबत आहेत, शिवाय यांच्यामध्ये वाद नसल्याचे देखील त्यांच्या निकवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान अशा वृत्तानंतर आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र माजी नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांच्याकडून ट्वीट करत दोघांमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पूर्वेश सरनाईक यांनी दोघांचे फोटो ट्वीट करत 'दो दिल और एक जान है हम' अशा स्वरुपाचे मेसेज ट्वीट केले आहे.
अधिक वाचा :