

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॅालीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला बऱ्याच वादांना सामोरे जावे लागले. तिच्यावर गंभीर आरोप करण्यात आले, ज्यामुळे तिला जेलमध्ये देखील जावे लागले. यादरम्यान रिया चक्रवर्ती खूप चर्चेत राहिली. येवढेच नाही तर सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांनी देखील हिला ट्रोल केले होते. त्यानंतर तिला बॅालीवूड क्षेत्रापासून लांब रहावे लागले. दीर्घकाळ वादात राहिलेली रिया आता पुन्हा एकदा कमबॅक करत बॅालिवूडमध्ये दिसणार आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये पार पडलेल्या फॅशन शो मध्ये ती रँप वॅाक करताना दिसून आली.
एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये रिया चक्रवर्तीने पुन्हा एकदा रँपवर आणि कॅमेऱ्यासमोर येणार असल्याचा खुलासा केला. दरम्यान तिने रँप वॅाकबद्दल बोलत असताना सांगितले की, मी रँप वॅाक करण्याकरिता खूप उत्साही होते. जवळपास 2 वर्षांच्या कालावधीनंतर या क्षेञात पुन्हा एकदा काम करताना मला खूप आनंद होत आहे. जून 2020 मध्ये बॅायफ्रेंड आणि अभिनेता सुशांत राजपूतच्या मृत्यूनंतर खूप वाईट परिस्थितींचा सामना करावा लागला. दरम्यान यावेळी बोलत असताना रियाने पुन्हा एकदा बॅालीवूडमध्ये येणार असल्याची तयारी चालू आहे असे सांगितले.
बॉलीवूडमधील पुनरागमनाबद्दल बोलताना रिया चक्रवर्ती म्हणाली, 'मी माझ्या पुनरागमनाची तयारी करत आहे आणि त्यासाठी मी यासाठी सध्या उत्तम अभिनय साकारण्यासाठी काही नवे बदल देखील शिकत आहे. मला आशा आहे की लवकरच काहीतरी मोठे होईल. रिया चक्रवर्तीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री शेवटच्या 'चेहरे' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात रियासोबत अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातील रिया चक्रवर्तीचा अभिनय चाहत्यांना खूप भावला.
हेही वाचा