Reah Chakraborty : सुधा भारद्वाजनी सांगितले रियाचे किस्से, काय घडलं जेलमध्ये?

Reah Chakraborty and Sudha Bharadwaj
Reah Chakraborty and Sudha Bharadwaj
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला २८ दिवस भायखळा तुरुंगात राहावं लागलं होतं. यावेळी तुरुंगात बंदीजनांसोबत तिचे वर्तन कसे होते, सर्व बंदीजन रियाला (Reah Chakraborty) जामीन मिळाल्यानंतर कसे आनंदी होते, याविषयी संपूर्ण कहाणी मानवाधिकार वकील सुधा भारद्वाज यांनी सांगितली. रिया चक्रवर्तीला सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात जेलमध्ये जावं लागलं होतं. २०२२ मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर जवळपास २८ दिवस भायखळा जेलमध्ये राहावं लागलं होतं. तुरुंगात रियासोबत राहिलेल्या मानवाधिकार वकील सुधा भारद्वाज यांनी तुरुंगात काय काय घडलं, याविषयी सांगितलं आहे. (Reah Chakraborty)

सुधा भारद्वाज एक मानवाधिकार वकील आहेत. रियाला भायखळा तुरुंगातून डिसेंबर, २०२१ मध्ये जामीन मिळाला होता. सुधा भारद्वाज यांना भीमा कोरेगाव केसमध्ये अटक झाली होती. तीन वर्षांनंतर त्यांची सुटका झाली होती. सुधा भारद्वाज यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, रियाने तुरुंगात कुठल्याही प्रकारचे नखरे दाखवले नाही. बंदीजनांसोबत मिळून राहिली. बंदीजनांनादेखील रिया आवडायची, जेव्हा रिया चक्रवर्तीला जामीन मिळाला तेव्हा सर्व बंदीजन तिला सोडायला तुरुंगाच्या गेटपर्यंत आले. रिया चक्रवर्तीकडे त्यावेळी जे काही पैसे होते, त्या पैशांतून बंदीजनांना मिठाई वाटली आणि डान्सदेखील केला.

'रियाला स्पेशल सेलमध्ये ठेवण्यात आले'

सुधा भारद्वाज म्हणाल्या, 'मीडियामध्ये सुरु असलेल्या सर्व गोष्टी पाहून आम्ही रियाला बळीचा बकरा म्हणत होतो. आम्ही निराश होतो. मात्र, रियाला मुख्य बॅरेकमध्ये आणलं नाही यासाठी मला आनंद झाला. तिला स्पेशल सेलमध्ये ठेवण्यात आले होते. मला वाटतं की, तिला स्पेशल सेलमध्ये यासाठी ठेवण्यात आलं होतं की, तिने टीव्ही पाहू नये. टीव्हीवर नेहमी हेच प्रकरण सुरु असायचं. या सर्व गोष्टी तिला चिंतेत टाकणाऱ्या होत्या.'

सुधा भारद्वाज पुढे म्हणाल्या, 'परंतु, मला एक गोष्ट आवर्जुन सांगायची आहे की, कुण्या तरुणीला या प्रकारच्या परिस्थिती टाकणे, तिला चिंतेत टाकणारं आहे. पण, रियाने हे सर्व सांभाळून घेतलं. ती तुरुंगात एकदम फ्रेंडली होती. पहिल्या दिवशी जेव्हा ते लोक (बंदिजन) विचारत होते की, रिया कुठे आहे? परंतु, रियाने कधी या गोष्टीचा मुद्दा केला नाही. आणि ती याबद्दल कधीच बोलणार नाही. जेव्हा तिची सुटका झाली , तेव्हा तिने तिच्याकडील असलेल्या काही पैशातून सर्वांना मिठाई दिली. सर्व बंदीजन तिला सोडण्यासाठी गेटपर्यंत आले. तेव्हा ते म्हणून लागले की, 'रिया एक डान्स, एक डान्स'. रियाने त्यांच्यासोबत डान्सदेखील केला.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news