

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील सिंहगडरोड परिसरातील नवले पुलाशेजारील एका हॉटेल बाहेर टोळक्याने गज आणि फावड्याच्या दांड्याने डोक्यात मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. दावत हॉटेल परिसरात २९ सप्टेंबरला सायंकाळी पावने सात वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने सिंहगड रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विजय ढुमे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, तो निवृत्त पोलिस कर्मचार्याचा मुलगा होता. त्यांचा रावेतमध्ये हॉटेल व्यवसाय आहे.
ढुमे हे दावत हॉटेलमध्ये थांबले होते. खाली उतरून आपल्या थारगाडीकडे जात असताना, पाठीमागून आलेल्या चौघांनी गज आणि लाकडी दांडक्याने ढुमे यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच सिंहगडरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी ढुमे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. उपचारासाठी त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हेही वाचा