

पुढारी ऑनलाईन: ज्या जगात मोठ्यांच्या पायांना स्पर्श करून, आशीर्वाद घेण्यास सांगितले जाते. लांबच्या नातेवाईकांच्या लग्न समारंभात जाण्यासाठी नकार दिल्यास तुम्ही कुटूंबातून बहिष्कृत होता. परंतु या जगात कोठेही कोणीही तुम्हाला 'नाही' म्हणायला शिकवत नाही. चला तर जाणून घेऊया समोरच्या व्यक्तीला राग न येता किंवा वाईट न वाटता 'नाही' कसं म्हणायचं. समोरच्याला अगदी सहज 'नकार' देण्यासाठी 'या' टिप्स (Relationship Tips) फॉलो करा…
कोणतेही काम असो किंवा नातेसंबंध असोत, यावर स्वत: ठाम असणे आवश्यक आहे. यामध्ये कोणालाही अनावश्यकपणे आमंत्रित करून त्यांना स्पष्टीकरण देत बसू नका. यामुळे त्याच्या कोणत्याही गोष्टीला नकार देणे आपल्याला अवघड होते. म्हणून दुसऱ्या व्यक्तीसमोर स्वत: च्या वैयक्तिक गोष्टींवर स्पष्टीकरण देणे टाळले पाहिजे.
कोणत्याही गोष्टीवर लगेच 'हो' किंवा 'नाही' असा प्रतिसाद देऊ नका. समोरच्याने दिलेली ऑफर किंवा प्रश्नावर विचार करण्यासाठी थोडा वेळ मागून घ्या आणि त्यानंतरच समोरच्या व्यक्तीला प्रतिसाद द्या. पुढच्या व्यक्तीला तुम्ही दिलेल्या ऑफर किंवा प्रश्नावर विचार करण्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे. मी तुमच्याकडे पुन्हा येऊ शकतो का, असा प्रश्न समोरच्या व्यक्तीला विचारा.
कोणत्याही गोष्टीमुळे किंवा व्यक्तीमुळे एखाद्या गोष्टीला नाही म्हणू नका. तर त्यामध्ये आवड नसेल, ईच्छा नसेल आणि आरामदायी वाटत नसेल तरच स्पष्टपणे नाही म्हणा. म्हणजेच स्वत:वर, स्वत:ची आवड असणाऱ्या गोष्टींवरच लक्ष केंद्रीत करा. अशा स्थितीत नाही म्हणताना, सध्याच्या परिस्थितीला या कामासाठी मी योग्य नाही. माझ्यामते XYZ ही व्यक्ती या कामासाठी आहे. मी यामध्ये आनंद घेऊ शकणार नाही, त्यामुळे मी ही गोष्ट टाळत असल्याचे स्पष्टपणे सांगा.
समोरच्या व्यक्तीचे एखादे काम करण्याच्या तुम्ही परिस्थितीत नसाल किंवा सध्या तुमच्याकडे वेळ नसेल, तेव्हा 'नाही' अशी पटकन प्रतिक्रीया देऊ नका. तर संबंधित कामासाठी पर्यायी वेळ किंवा व्यवस्था सूचवा. मी या आठवड्यात हे काम करू शकत नाही, परंतु पुढील आठवड्यात करू शकतो, असा प्रतिसाद द्या. मैत्रिमध्ये एखादी गोष्ट करताना, तुमच्या जमणाऱ्या गोष्टींनाच होय म्हणा.