Red Card In Cricket : क्रिकेटमध्येही आता ‘रेडकार्ड’; संघांना एक चूकही पडणार महागात!

Red Card In Cricket : क्रिकेटमध्येही आता ‘रेडकार्ड’; संघांना एक चूकही पडणार महागात!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसी) गेल्या काही महिन्यांमध्ये क्रिकेटच्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. शिवाय, अनेक नियमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये नो बॉलच्या सॉफ्ट सिग्नलपासून अनेक नियमांचा समावेश आहे. आता फुटबॉलप्रमाणे क्रिकेटमध्येही रेडकार्ड दाखवण्याची पद्धत येणार आहे. करेबियन प्रिमियर लीगमध्ये हा प्रयोग करण्यात येणार आहे. (Red Card In Cricket)

पंचांना केव्‍हा वापरता येणार रेड कार्ड?

फुटबॉलमध्ये पंच खेळाडू बेशिस्‍त वर्तनानंतर केव्हाही रेडकार्ड दाखवू शकतात. मात्र, क्रिकेटमध्ये असे होणार नाही. डावातील शेवटच्या षटकामध्येच पंचांना रेडकार्डचा वापर करण्‍याचा अधिकार असणार आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाने वेळेत षटक टाकली नाहीत तरच रेडकार्डचा वापर करता येणार आहे. त्यामुळे गोलंदाजी संथ गतीने झाली तरच रेडकार्डचा वापर करता येणार आहे. करेबियन प्रिमियर लीगच्या ११ व्या मौसमाला १७ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या लीगमध्येच रेडकार्डच्या वापरास सुरुवात होणार आहे. (Red Card In Cricket)

कसे असतील रेडकार्डचे नियम (Red Card In Cricket)

  • टी २० सामन्यातील एक डाव ८५ मिनिटांचा असणार आहे. सर्व संघांना निर्धारित वेळेत षटके टाकावी लागणार आहेत.
  • १७ वे षटक ७२.१५ मिनिटांत, १८ वे षटक ७६.३० मिनिटांत, १९ वे षटक ८०.४५ मिनिटांत आणि २० वे षटक ८५ मिनिटांत पूर्ण करावे लागणार आहे.
  • या दरम्यान वेगवेगळे नियम लागू होतील. जर एखादा संघ १८ वे षटक वेळेत टाकू शकला नाही, तर ५ क्षेत्ररक्षक ३० यार्डच्या आतमध्ये आणले जातील
  • जर १९ व्या षटकाच्या आधी स्लो-ओव्हर रेट असेल, तर दोन खेळाडू ३० यार्ड वर्तुळात असतील. म्हणजे एकूण ६ खेळाडू ३० यार्ड सर्कलमध्ये असतील. (Red Card In Cricket)

नियमांचे उल्लंघन केल्यास फलंदाजांनाही मिळणार शिक्षा

स्लो-ओव्हर रेट केवळ गोलंदाजी करणाऱ्या संघामुळेच होतो असे नाही. काही वेळेस फलंदाजांचीही चूक यास कारणीभूत असते. त्यामुळे फलंदाजांमुळे षटके टाकण्यास विलंब झाल्यास त्यांच्याकडूनही दंड आकरला जाणार आहे. अशा परिस्थितीत फलंदाजाला वॉर्निंग देईल. मात्र, फलंदाजांकडून चुकांची पुनरावृत्ती झाल्यास ५ धावांचा फटका बसणार आहे. (Red Card In Cricket)

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news