‘जाऊ बाई गावात’ शो जिंकल्यानंतर रमशा फारुकीचा मोठा निर्णय, २० लाख घेऊन…

रमशा फारुकी
रमशा फारुकी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ११ फेब्रुवारी रोजी रंगलेल्या 'जाऊ बाई गावात' ह्या बहुचर्चित शो च्या पहिल्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात 'रमशा फारुकी' महाविजेती ठरली. रमशाला २० लाखाचा धनादेश आणि जाऊ बाई गावातची मानाची ट्रॉफी देण्यात आली. मनोरंजन आणि तीव्र संघर्षांनी भरलेल्या 3 महिन्यांच्या रोलरकोस्टर राईडनंतर, 'रमशा फारुकी, 'रसिक ढोबळे, 'संस्कृती साळुंके', 'अंकिता मेस्त्री' आणि 'श्रेजा म्हात्रे'ह्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये चुरचीशी स्पर्धा पाहायला मिळाली.

संबंधित बातम्या –

आदेश बांदेकर, सोनाली कुलकर्णी आणि महेश मांजरेकर हे या कार्यक्रमाला खास पाहुणे लाभले होते.

दान करणार पैसे

हा शो जिंकल्यानंतर रमशाने सोशल मीडियावर लाईव्ह येत प्रेक्षकांचे आभार मानले. मीडिया रिपोर्टनुसार, तिने मोठी घोषणा केली की. शोमध्ये विजेती रक्कम २० लाख रुपये दान करणार असल्याचे सांगितले. तिने ही रक्कम बावधन गावातील शाळेसाठी दान केली.

ट्रॉफी जिंकल्यानंतर काय म्हणाली होती रमशा?

रमशाने आपला आनंद व्यक्त करताना सांगितले, " Oh My God ! तो क्षण जेव्हा सरांनी माझं नाव घेतलं आणि म्हणाले की, गावाची लाडकी लेक आणि 'जाऊ बाई गावातच्या' पहिल्या पर्वातली विजेती आहे 'रमशा'. तेव्हा मला वाटत होतं की मी स्वप्न पाहत आहे. कारण गेले २ महिने मी हा क्षण स्वप्नात पाहत होती. पण जेव्हा गावकऱ्यांचा उत्साह आणि सगळे स्पर्धक मला मिठी मारायला आले तेव्हा वाटलं खरंच मी विजेती झाली आहे. माझ्या मनात तो डायलॉग चालू होता 'इतनी शिद्दत से इस ट्रॉफी को पाने की कोशिश की है की हर एक गावकरी ने इससे मुझे मिलाने की साज़िश की है".

खरंच बेस्ट मोमेन्ट आहे लाईफचा. मी स्वतःला हेच म्हणाली की, ही फक्त सुरुवात आहे रमशा अजून तुला खूप पुढे जायचं आहे आणि जसं 'जाऊ बाई गावात' या शोला १०० % दिले आहे. तसेच पुढे ही द्यायचं आहे. कारण यशासाठी कुठचा ही शॉर्टकट नाही. माझ्या धन्यवादाची लिस्ट खूप मोठी आहे सुरुवात गावकऱ्यांपासून करेन मला त्यांनी प्रेम, माणुसकी, आपली संस्कृती शिकवली, थोडक्यात सुखी कसं राहायचं हे शिकवलं. मी कधी विचारही केला नव्हता की, कोणी इतकं आपल्यावर प्रेमही करू शकतं. 'जाऊ बाई गावात' आणि झी मराठीच्या पूर्ण टीमचे मनपूर्वक आभार मानायचे आहेत. इतकी सुंदर संधी दिली आणि मला एवढं शिकायला मिळालं आणि प्रेक्षकांचे धन्यवाद त्यांनी मला आपलं मानल आणि प्रेम दिलं. मी गावाला खूप मिस करणार आहे. मी ठरवले आहे की, मी गावात एक घर घेणार, मी गावाच्या इतकं प्रेमात पडली आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news