

पुढारी ऑनलाईन डेस्क : शुभमन गिल शतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोरचा ६ विकेट्सने धुव्वा उडवला. हा सामना बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. दरम्यान, गुजरातच्या या विजयमुळे मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. गुजरातचा पराभव केला असता तर आरसीबीला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळाला असता. मात्र, गुजरातने आरसीबीचा पराभव करत विराटच्या संघाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. (RCB vs GT)
सुरुवातीला नाणेफेक जिंकल्यानंतर गुजरातने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या आरसीबीने १९७ धावा केल्या आणि गुजरातसमोर १९८ धावांचे आव्हान ठेवले. आरसीबीचे १९८ धावांचे आव्हान गुजरातने १९.१ षटकांमध्ये गाठले. गुजरातकडून, वृद्धिमान सहा १४ चेंडूमध्ये १२ धावा, विजय शंकर ३५ चेंडूमध्ये ५३ धावा, शुभमन गिल , डेव्हिड मिलरने ७ चेंडूमध्ये ६ योगदान दिले. आरसीबीकडून मोहम्मद सिराज, हर्षल पटेल आणि विजयकुमार व्यश्यकने प्रत्येकी १ विकेट पटकावली. (RCB vs GT)
तत्पूर्वी, आरसीबीने विराटच्या शतकी खेळीच्या जोरावर १९७ धावा केल्या होत्या. आरसीबीकडून विराट कोहली ६१ चेंडूमध्ये १०१, फॅफ डू प्लेसीस १९ चेंडूमध्ये २८ धावा, ग्लेन मॅक्सवेल ५ चेंडूमध्ये ११ धावा, ब्रेसवेलने १६ चेंडूमध्ये २६ धावांचे योगदान दिले. गुजरात टायटन्सकडून नूर अहमदने २ तर मोहम्मद शमी, यश दयाल आणि राशिद खानने प्रत्येकी १ विकेट पटकावली. (RCB vs GT)