

पुढारी ऑनलाईन डेस्क : दाेन हजार रुपयांची नोटा चलन बाद होणार आहेत. यामुळे काळा पैसा असणाऱ्यांना चाप बसेल. काळा पैसा असणार्यांना उत्तर द्यावेच लागणार आहे, असे मत २००० हजारांच्या नोटा बंदीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ( दि.२०) माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. (RBI withdraws ₹2000 note)
दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या नोटांची छपाई बंद केली जाणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.१९) देण्यात आली आहे. दोन हजाराच्या नोटा बँकांत जमा करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले, " दाेन हजारांच्या नोटा चलन बाद होणार आहेत. काळा पैसा असणाऱ्यांना चाप बसणार आहे. त्यांना उत्तर द्यावेच लागणार आहे."
हेही वाचा :