Karnataka CM oath taking ceremony | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह आज ८ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, मल्लिकार्जुन खर्गे यांची माहिती | पुढारी

Karnataka CM oath taking ceremony | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह आज ८ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, मल्लिकार्जुन खर्गे यांची माहिती

पुढारी ऑनलाईन : कर्नाटकाचे ३२ वे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि उपमुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) आज शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Congress president Mallikarjun Kharge) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आठ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्यात सर्वजण उपस्थित राहणार आहेत. मीही त्यासाठी जात आहे. ही आनंदाची बाब आहे की कर्नाटकात नवीन आणि मजबूत काँग्रेस सरकार सत्तेवर आले आहे. याचा फायदा कर्नाटकला होईल आणि त्यामुळे देशात चांगले वातावरण निर्माण होत आहे”, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे.

आठ राज्यांचे मुख्यमंत्री, चार माजी मुख्यमंत्री, देशातील प्रमुख विरोधी पक्ष नेते, भाजपेतर पक्षांचे खासदार अशा राष्ट्रीय नेत्यांच्या मांदियाळीत शनिवारी दुपारी १२.३० वाजता येथील कंठिरवा स्टेडियमवर काँग्रेस सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे.

सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका- गांधी वाड्रा यांना शपथविधी सोहळ्यासाठी औपचारिक निमंत्रण दिले आहे.

भाजपेतर सगळ्या पक्षांना एकत्र आणून आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करता येईल, असा काँग्रेसचा अंदाज आहे. त्यामुळेच आठ राज्यांचे मुख्यमंत्री, चार राज्यांचे माजी मुख्यमंत्री तसेच सगळ्या प्रमुख पक्षांच्या मुख्य नेत्यांना सिद्धरामय्यांच्या शपथविधी सोहळ्याला निमंत्रित करण्यात आले. भाजपेतर दुसरी आघाडी करण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न आहे. सगळ्या नेत्यांनी निमंत्रण स्वीकारले आहे.

 हे ही वाचा :

Back to top button