पुणे : लाचखोरीमुळे अटक झालेला रामोड हा पहिला आयएएस

पुणे : लाचखोरीमुळे अटक झालेला रामोड हा पहिला आयएएस
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नांदेडसारख्या दुर्गम भागातून सरकारी सेवेत अप्पर आयुक्तपदापर्यंत आलेल्या डॉ. अनिल रामोड याचा प्रवास रोमांचक आहे. येत्या दिवाळीनंतर पुण्यातील त्याचा कार्यकाळ पूर्ण होऊन त्याला जिल्हाधिकारी म्हणून स्वतंत्र कार्यभार मिळणार होता. लाचेच्या आरोपातून सीबीआयच्या अटकेत जाणारा तो पहिलाच आयएएस अधिकारी ठरला आहे.

रामोड हा मूळचा मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातला असून, 1997 मध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन उपजिल्हाधिकारी पदावर परभणी येथे रुजू झाला. यानंतर त्याने नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथे उपजिल्हाधिकारी मागासवर्ग कक्ष व समाजकल्याण कमिटी सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

त्यानंतर तेथेच विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय उपायुक्त (पुरवठा विभाग) म्हणून काम पाहिले. या पदावर असतानाच तो आयएएस केडरमध्ये ऑक्टोबरमध्ये त्याच्या पुणे येथील सेवेचा 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होऊन जिल्हाधिकारी म्हणून स्वतंत्र कार्यभार मिळणार होता. मात्र त्या पूर्वीच रामोड सीबीआयच्या जाळ्यात अडकला.

अतिविश्वास नडला..

रामोड याची आतापर्यंतची कारकीर्द स्वच्छ आहे, त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई होताच त्याचे 'होम टाऊन' असलेल्या मराठवाड्यातील नांदेड व छत्रपती संभाजीनगर येथील अधिकार्‍यांच्या वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर काही अधिकार्‍यांनी सांगितले की, स्वच्छ प्रतिमेचा अधिकारी अशीच त्याची आजवर प्रतिमा होती. मात्र पुणे शहरात गेल्यापासून त्याला सहकारी अधिकारी व कर्मचार्‍यांवरचा अतिविश्वास नडला, असे सूचक वक्तव्य त्याच्या जवळच्या अधिकारी मित्रांनी केले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news