Rakul Preet Wedding : रकुल प्रीत सिंह -जॅकी भगनानीचे प्री-वेडिंग फोटो व्हायरल
पुढारी ऑनलाईन डेस्क : रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानीचे लग्नाचे फोटो पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स खूप उत्सुक आहेत. दरम्यान, वेडिंग डेस्टिनेशनचे काही फोटो समोर आले आहेत. (Rakul Preet Wedding) बॉलीवुडचे लव्ह बर्ड रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी २१ फेब्रुवारी, २०२४ रोजी लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. कुटुंबीय आणि जवळचे मित्रमंडळींच्या उपस्थितीत रकुल आणि जॅकी सात फेरे घेतील. हे कपल गोव्यासाठी रवाना झाले आहे. पै-पाहुणेदेखील पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर काही फोटो समोर आले आहेत. (Rakul Preet Wedding)
संबंधित बातम्या –
स्वागताला पाहुण्यांसाठी नारळ
विरल भयानी यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. एका फोटोमध्ये शहाळे दिसते. दुसऱ्या फोटोमध्ये वेलकम कार्ड दिसते. पाहुण्यांसाठी वेलकम ड्रिंक्समध्ये शहाळे (नारळ पाणी) देण्यात येणार असल्याचे समजते. त्यावर रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांच्या नावाचे पहिले अक्षर आणि सुंदर डिझाईन प्रिंट केलेली दिसते.
सुंदर फुलांनी सजवले वेलकम बोर्ड
वेलकम बोर्ड (कार्ड) वर "भगनानी आणि सिंह फॅमिली आपले स्वागत करत आहे" असे लिहिले आहे. हे लग्न गोव्यातील एका आलीशान हॉटेलमध्ये होत आहे. वेडिंगशी संबंधित प्रथा, विधी, रितीरिवाज समुद्र किनारी होईल. सूत्रांच्या माहितीनुसार, हे कपल बीचवर फेरे घेताना दिसू शकते. लग्नादिवशी जॅकी आपल्या लेडी लव्हसाठी एक गाणेदेखील सादर करेल, हे लग्नाचे हायलाईट राहील.
रकुल आणि जॅकीच्या लग्नाची गेस्ट लिस्ट
रिपोर्टनुसार, गेस्ट लिस्टमध्ये अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलगी नितारा, वरुण धवन आणि नताशा, शाहिद कपूर आणि अनन्या पांडे सहभागी आहेत.

