राज्‍यसभा निवडणूक : ‘सपा’ला मोठा झटका, मुख्‍य प्रतोद पांडेंसह तीन आमदारांनी केले बंड

राज्‍यसभा निवडणुकीच्‍या मतदानापूर्वीच मनोज कुमार पांडे समाजवादी पार्टीचे मुख्‍य प्रतोद (व्‍हीप) पदाचा राजीनामा दिला आहे.
राज्‍यसभा निवडणुकीच्‍या मतदानापूर्वीच मनोज कुमार पांडे समाजवादी पार्टीचे मुख्‍य प्रतोद (व्‍हीप) पदाचा राजीनामा दिला आहे.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राज्‍यसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीला (सपा) मोठा झटका बसला आहे. पक्षाचे मुख्‍य प्रतोद (व्‍हीप) मनोज कुमार पांडे यांच्‍यासह तीन आमदारांनी बंडखोरी केली आहे. मनोज पांडे यांनी प्रतोद पदाचा राजीनामा दिला आहे. त्‍यांनी आपला राजीनामा पक्षाचे अध्‍यक्ष अखिलेश यादव यांच्‍याकडे सोपविला आहे. ( Rajya Sabha Elections 2024 )

"समाजवादी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या मुख्य व्हीप पदाचा राजीनामा दिला आहे, असे मनोज कुमार पांडे यांनी आपल्‍या पत्रात म्‍हटले आहे. राज्‍यसभा निवडणुकीत विवेकाच्या आधारे मतदान करणार आहोत, असे पांडे यांच्‍यासह अमेठी गौरीगंज येथील सपाचे आमदार राकेश प्रताप सिंह, अभय सिंह यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे. ( Rajya Sabha Elections 2024 )

आमदार राकेश प्रताप सिंह यांनी आपल्या पक्षाच्या दोन्ही बैठकांना हजेरी न लावल्याने बंडखोरीचा पवित्रा घेतल्‍याचे स्‍पष्‍ट झाले हाेते. पांडे यांच्‍यासह राकेश प्रताप सिंह आणि अभय सिंह भाजपच्या बाजूने मतदान करू शकतात, असे मानले जात आहे. दरम्‍यान, राकेश पांडे यांचा खासदार असलेले पुत्र रितेश पांडे याने दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपचे आठही उमेदवार विजयी होतील : सिद्धार्थनाथ सिंह

राज्यसभा निवडणुकीबाबत भाजप नेते सिद्धार्थनाथ सिंह म्हणाले की, भाजपकडे आठ उमेदवार आहेत, ते सर्व राज्‍यसभा निवडणूक जिंकतील. कोणावरही आरोप करण्यापूर्वी हेही बघा की तुमच्या घरातील सदस्यांना तुमच्यापासून का पळून जायचे आहे?, असा सवालही त्‍यांनी केला. सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांना सबबी सांगण्याची सवय लागली आहे. २०१७, २०१९ निवणडणुकीतही त्‍यांनी अशीच कारणे दिली हेती. आताही ते तिचे कारणे सांगत आहेत, अशी टीकाही त्‍यांनी केली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news