

पाली; पुढारी वृत्तसेवा : सुधागड तालुक्यातील महागाव फाटा सिनिरीटी फॉर्म हाऊसजवळ खेमवाडी – पेण बस (क्रमांक एम एच 07 सी 7488) चा ब्रेक फेल होऊन अपघात झाला. ही घटना आज (दि.27) सकाळी घडली. अपघातग्रस्त बसमध्ये 13 प्रवासी होते. त्यामधील 7 प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातातील जखमींना पाली येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल केले आहे.
हेही वाचलंत का ?