मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांना लवकरच सर्वोच्च न्यायालयात बढती, कॉलिजियमने केली शिफारस | पुढारी

मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांना लवकरच सर्वोच्च न्यायालयात बढती, कॉलिजियमने केली शिफारस

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती पदासाठी शिफारस झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलिजियमने मंगळवारी ही शिफारस केली. कॉलिजियमच्या शिफारशीचा मसुदा सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेला आहे.

मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्या. दत्ता यांची एप्रिल 2020 मध्ये नियुक्ती झाली होती. तत्पूर्वी ते कोलकाता उच्च न्यायालयात वरिष्ठ न्यायमूर्ती होते. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वाखालील कॉलिजियमने न्या. दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नेमणूक करण्याची शिफारस केली आहे. केंद्र सरकारकडून या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर न्या. दत्ता यांच्या नेमणुकीची अधिसूचना निघेल. कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती स्व. सलील कुमार दत्ता यांचे पुत्र असलेले न्या. दिपांकर दत्ता यांनी कोलकाता विद्यापीठातून 1989 साली एलएलबीची पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी विविध राज्यांतील उच्च न्यायालये तसेच सर्वोच्च न्यायालयात वकिली केली होती.

हेही वाचा : 

Back to top button