Rahul Dravid : अखेर वर्ल्डकप फायनल पराभवावर राहुल द्रविड यांनी सोडले मौन, “हे हृदयद्रावक…”

राहुल द्रविड ( संग्रहित छायाचित्र )
राहुल द्रविड ( संग्रहित छायाचित्र )
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय क्रिकेट संघ सध्‍या दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर आहे. टी-20 आणि वन-डे मालिका झाल्‍यानंतर आता कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मंगळवार, २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जाणार आहे. दरम्‍यान, या सामन्‍यापूर्वी १९ नोव्‍हेंबर रोजी वनडे वर्ल्डकप फायनल  सामन्‍यातील पराभवावर ( ODI cricket world cup final ) मुख्‍य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी मौन सोडले आहे. ( Rahul Dravid on world cup final)

वन-डे विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्‍यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून सहा विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. याबाबत बोलताना राहुल द्रविड म्‍हणाले की, "हा हृदयद्रावक पराभव होता; पण आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्हाला वेगाने पुढे जावे लागेल. आमच्यापुढे आणखी एक महत्त्वाची मालिका आहे आणि या सर्व मालिका दुसर्‍या ICC स्पर्धेसाठी (जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल) पात्र होण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत."

Rahul Dravid on world cup final : तुम्‍हाला यामधून सावरायला पाहिजे…

राहुल द्रविड म्‍हणाले की, "तुम्हाला निराश व्हायला वेळ नाही. तुम्हाला त्यातून सावरले पाहिजे आणि पुढे जावे लागेल. विश्‍वचषक स्‍पर्धेतील अंतिम सामन्‍यातील पराभवानंतर आम्ही निराश झालो होतो; पण आता आम्ही त्यातून पुढे आलो आहोत. मला वाटते की, टीम इंडियाच्‍या वनडे संघाने खरोखरच चांगली कामगिरी केली आणि मालिका जिंकली."

दक्षिण आफ्रिकेच्‍या खेळपट्टीचे वेगळे आव्‍हान

दक्षिण आफ्रिकेमधील खेळपट्टीचे आव्‍हान हे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियापेक्षा थोडे वेगळे आहे. इथे खेळणे सोपे नाही; पण आम्ही येथेही चांगली कामगिरी केली आहे. इतर देशांच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेच्‍या खेळपट्टीवर चेंडू बाऊन्स असमान आहे. तुम्हाला इथे इंग्लंडसारखा स्विंग मिळत नाही किंवा ऑस्ट्रेलियाप्रमाणे पुरेसा वेग आणि उसळी मिळत नाही, असेही द्रविड यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.
यावेळी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर इतिहास रचण्याचा प्रयत्न करेल. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर अद्याप एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. यावेळी तिला हा दुष्काळ संपवायचा आहे. 2010 मध्ये भारताची सर्वोत्तम कामगिरी होती, जेव्हा एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघ कसोटी मालिका 1-1 ने बरोबरीत राखण्यात यशस्वी ठरला होता.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news