Rahane vs BCCI : रहाणेने BCCI ला घेतलं शिंगावर, खराब फॉर्मला बोर्डाला धरले जबाबदार

Rahane vs BCCI : रहाणेने BCCI ला घेतलं शिंगावर, खराब फॉर्मला बोर्डाला धरले जबाबदार
Rahane vs BCCI : रहाणेने BCCI ला घेतलं शिंगावर, खराब फॉर्मला बोर्डाला धरले जबाबदार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rahane vs BCCI : भारतीय कसोटी फलंदाज अजिंक्य रहाणेला त्याच्या सातत्यपूर्ण खराब फॉर्ममुळे टीकेला सामोरे जावे लागत आहे. फॉर्ममध्ये परतण्यासाठी तो या रणजी हंगामात मुंबई संघाकडून खेळणार आहे. रहाणे या देशांतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी करून भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल अशी आशा आहे. रहाणे याआधी कसोटी संघाचा उपकर्णधारही होता, मात्र दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी त्याला या पदावरून हटवण्यात आले आणि आता श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची संघात निवड होणार नसल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. बीसीसीआयने रहाणेला याबाबत माहिती दिल्याचेही समजते आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणेचा फॉर्म का बिघडला यावर तो पहिल्यांदाच उघडपणे बोलला आहे. रहाणे म्हणाले की, सत्य हे आहे की जेव्हा तुम्ही क्रिकेटचा एकच फॉरमॅट (कसोटी क्रिकेट) गेली २-३ वर्षे सतत खेळत आहात आणि रणजी क्रिकेट आणि इतर देशांतर्गत स्पर्धा आयोजित केल्या जात नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही घरी बसून धावा कशा करू शकता आणि ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. तुम्ही किती सराव करत आहात आणि किती नेट सेशन्स घेत आहात हे महत्त्वाचे नाही. यातून आत्मविश्वास मिळवता येत नाही. खेळाच्या वेळेत आणि सामन्यांमध्ये धावा केल्याने आत्मविश्वास येतो,' असे त्याने सांगितले आहे. (Rahane vs BCCI)

कोविडमुळे गेल्या दोन वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटचे आयोजन करण्यात आले नाही, आणि हीच परिस्थिती आपला फॉर्मला खराब होण्यास जबाबदार असल्याचे रहाणेने म्हटले आहे. रेड बॉल क्रिकेट (डोमेस्टिक टूर्नामेंट) न खेळता टेस्टसाठी तुमचा फॉर्म कसा राखता येईल, हेही त्यांने स्पष्ट केले आहे. साहजिकच रहाणेने आपल्या खराब फॉर्मसाठी थेट बीसीसीआयला जबाबदार धरले आहे. (Rahane vs BCCI)

दरम्यान, काहीदिवसांपूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रहाणे आणि पुजाराला यांच्या फोर्मवरून मोठी प्रतिक्रीया दिली होती. रहाणे आणि पुजाराने त्यांच्या फॉर्ममध्ये जोरदार पुनरागमन करावे अशी अपेक्षा गांगुलींनी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, भारतीय क्रिकेट संघाचे हे दोन अनुभवी कसोटीपटू गेल्या काही काळापासून अत्यंत खराब फॉर्मशी झुंज देत आहेत. परदेश दौऱ्यांवर अत्यंत नाजूक प्रसंगी धावा करण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला यात शंका नाही. दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर नुकतीच झालेली कसोटी मालिका पुजारा आणि रहाणेच्या खराब फॉर्मने भारताला गमवावी लागली,' अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. (Rahane vs BCCI)

रहाणे आणि पुजारा या दोन्ही अनुभवी खेळाडूंनी आता रणजी ट्रॉफीमध्ये परत खेळावे आणि त्यांचा फॉर्म परत मिळवावा अशी सौरव गांगुलींनी इच्छा व्यक्त केली होती. हे दोघेही कसोटी क्रिकेटचा भाग आहेत आणि त्यांना पांढऱ्या चेंडूच्या फॉरमॅटमध्ये स्थान नाही. या दोन खेळाडूंच्या दीर्घ फॉर्ममुळे अनेक समीक्षकांना वाटते की श्रेयस अय्यर, हनुमा विहारी आणि खेळाडूंना संधी देण्याची योग्य वेळ आली आहे. चेतेश्वर पुजाराने २०१९ च्या सुरुवातीला आपले शेवटचे कसोटी शतक फटकावले होते. तो शेवटच्या १६ कसोटी सामन्यांमध्ये फक्त २७.९३ च्या सरासरीने ८१० धावा केल्या आहेत. (Rahane vs BCCI)

दुसरीकडे, फॉर्ममुळे कसोटी उपकर्णधारपद गमावलेल्या रहाणेने गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या १३ कसोटी सामन्यांमध्ये २०.८२ च्या सरासरीने केवळ ४७९ धावा केल्या. सौरव गांगुलींना वाटते की, हे दोघेही इतके अनुभवी आहेत की एकदा ते देशांतर्गत क्रिकेट खेळले की त्यांचा फॉर्म परत येऊ शकतो. (Rahane vs BCCI)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news