

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (FTII) अध्यक्षपदी अभिनेता आर. माधवन यांची निवड झालेली आहे. माधवन यांनी भूमिका केलेल्या रॉकेट्री : द नम्बी इफेक्ट या सिनेमाला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकून यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. (R Madhavan new FTII President)
अभिनेता आर. माधवन यांच्या अनुभवाचा एफटीआयआयला मोठा लाभ होईल, असे ठाकूर यांनी म्हटले आहे. (R Madhavan new FTII President)
तर आर. माधवन यांनी या नियुक्तीसाठी आभार मानले आहेत, तसेच संस्थेला पूर्ण न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे म्हटले आहे.
आर. माधवन यांच्या थ्री एडिएटल, रहना है तेरे दिलमे, रॉकेट्री : द नम्बी इफेक्ट अशा विविध चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. त्याचा आगामी द टेस्ट हा सिनेमा क्रिकेटवर बेतलेला आहे.
हेही वाचा