

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता आर माधवन आणि दिग्दर्शक शशिकांत यांचा स्पोर्ट्स ड्रामा 'टेस्ट' या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच संपले आहे. (R. Madhavan) आर माधवन याने या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केल्याचं समजते. अष्टपैलू अभिनेता आणि अभिनयाची अनोखी शैली असलेला अभिनेता यात अतिशय मनोरंजक पात्र साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचं आणि मोशन पोस्टर रिलीज झाल्यापासून चाहत्यांमध्ये या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. (R. Madhavan)
"टेस्ट" हा चित्रपट क्रिकेट टेस्ट मॅचवर आधारित तो क्रीडाप्रेमींसाठी एक पर्वणी ठरणार आहे. आर माधवन आणि सिद्धार्थ या चित्रपटासाठी १७ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले असून नयनतारा या चित्रपटामध्ये असल्याने या चित्रपटाला चार चाँद लागणार आहेत.
या पॅन-इंडिया स्पोर्ट्स ड्रामामध्ये नयनतारा आणि सिद्धार्थ देखील प्रमुख भूमिकेत असल्याचे समजते. अलीकडेच आर माधवनने 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केल्याबद्दल 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक'चा पुरस्कारही जिंकला आहे. "टेस्ट" साठी सगळेच पुन्हा एकदा उत्सुक झाले आहेत.