Hyderabad Suicide : ब्लाउज शिवण्यावरून टेलर नवऱ्यासोबत भांडण; बायकोनं केली आत्महत्या

Hyderabad Suicide : ब्लाउज शिवण्यावरून टेलर नवऱ्यासोबत भांडण; बायकोनं केली आत्महत्या
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क 

हैदराबादमध्ये एका 35 वर्षीय महिलेचा पतीसोबत ब्लाउज शिवण्यावरुन वाद झाला. त्यामुळे पत्नीने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. विजयलक्ष्मी असे त्या महिलेचे नाव असून, ती आपला पती श्रीनिवाससोबत अंबरपेटमधील गोलनाका थिरुमला नगरमध्ये राहत असल्याची माहिती समजते. पतीसोबत वाद झाल्यानंतर विजयलक्ष्मीचा मृतदेह घरात पडलेला आढळून आला आहे. (Hyderabad Suicide)

याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्रीनिवास हा घरोघरी जाऊन साड्या आणि ब्लाउज शिवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू विकत असे. त्याचबरोबर तो घरीही ब्लाउज शिवण्याचे काम करत होता. श्रीनिवासने आपल्या पत्नीसाठी ब्लाउज शिवले होते. मात्र ते ब्लाऊज तिला आवडले नसल्याने तिने पतीला पुन्हा ब्लाउज शिवण्यास सांगितले.

यानंतर श्रीनिवासने पत्नीला स्वतः ब्लाउज शिवण्यास सांगितल्यावर तिला खूपच वाईट वाटले आणि तिच्या मनाला खटकले. यावर नाराज होवून विजयलक्ष्मीने दुसऱ्या दिवशी स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले. दुसऱ्या दिवशी त्यांची मुलं शाळेतून परत आली तेव्हा त्यांना ती खोली अजूनही बंद असल्याचे निदर्शनास आले. (Hyderabad Suicide)

खोलीतून कोणताही आवाज येत नसल्याने त्यांनी श्रीनिवासला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर त्याने घरी आल्यानंतर खोलीचा दरवाजा मोडून उघडला. खोलीत प्रवेश केल्यावर त्याला धक्काच बसला. खोलीत विजयलक्ष्मीचा मृतदेह फासावर लटकलेला होता. हे बघून त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. या घटनेची वर्दी पोलिसांत दिल्यावर, श्रीनिवासने पोलिसांनी सांगितले की, जेव्हा जेव्हा त्याची पत्नी नाराज असायची तेव्हा ती स्वतःला खोलीत कोंडून घ्यायची. त्यामुळे ब्लाऊजच्या कारणांवरूनही ती असे पाऊल उचलेल असे कधी वाटले नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news