Pushpa Movie : लाल चंदनासाठी इतका रक्तपात का होतो ?

'लाल चंदनाची तस्करी'वर आधारीत पुष्‍पा चित्रपट सध्‍या बाॅक्‍स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
'लाल चंदनाची तस्करी'वर आधारीत पुष्‍पा चित्रपट सध्‍या बाॅक्‍स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क 

आयकाॅन स्टार म्हणून ओळखला जाणारा दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा 'पुष्पा : द राईज' नावाचा (Pushpa Movie) चित्रपट बाॅक्स ऑफिसवर, इतकंच नाही तर ओटीटीवरही धुमाकूळ घालतोय. 'लाल चंदनाची तस्करी' हा या चित्रपटाचा मुख्य विषय आहे; पण, लाल चंदन आहे काय? त्याच्यासाठी एवढा रक्तपात का होतो? त्याची किंमत एवढी जास्त का आहे? आणि हे चंदन फक्त भारतात कुठे आढळते? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची आहेत.

लाल चंदनासाठी प्रसिद्ध शेषाचलम जंगल

लाल चंदनाचं शास्त्रीय नाव 'टेरोकार्पस सेन्टेन्स' असं आहे. ते तामिळनाडूच्या सीमेवर आणि आंध्र प्रदेशच्या हद्दीत असणाऱ्या जंगलात आढळते. जंगलाचं नाव शेषाचलम असं आहे. आंध्रातल्या नेल्लोर, कुरनूल, चित्तूर आणि कडप्पाड या ४ जिल्ह्यांच्या हद्दीपर्यंत हे जंगल पसरलंय. सव्वा दोन लाख हेक्टर इतक्या अफाट क्षेत्रामध्ये हे जंगल पसरलंय. साधारण ११ मीटरपर्यंत लाल चंदनाचं झाडं उंचीला वाढतं. लाकडाची घनता जास्त असल्यामुळे या झाडाचं खोड पाण्यात बुडतं.

लाल चंदन इतकं महाग का आहे? 

चीन, जपान आणि इतरही देशांमधील राजे-रजवाडे, धर्म पंडीत, सौंदर्यवती आणि देवभक्त लोक लाल चंदनाला वापरासाठी प्राथमिकता दर्शवितात. त्यासाठी ते वाट्टेल ते किंमत ते मोजायला तयार असतात. अलिशान घरातील, राजवाड्यांतील उंची फर्निचर तयार करण्यासाठी, दारू व सौंदर्य प्रसाधनं बनविण्यासाठी, औषधांसाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पूजेचं साहित्य बनविण्यासाठी लाल चंदनाची मागणी परदेशातून जास्त असते. सध्या त्‍याची चीनमधून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची खूप किंमत आहे. (Pushpa Movie)

भारतावर लाल चंदनाच्या सुरक्षेची जबाबदारी का?

याचं उत्तर लाल चंदन फक्त भारतातच आढळते आणि तेही शेषाचलम याच जंगलात आढळते. कारण, ही झाडं फक्त याच जंगलात वाढतात. आंतरराष्ट्रीय करारानुसार लाल चंदनाच्या झाडाच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी भारतावर आहे. त्यासाठी एक विषेश टास्क फोर्स तयार करण्यात आलं आहे. चंदनाची तस्करी रोखण्यासाठी प्रशासन आणि तस्करांमध्ये अनेक वेळा चकमकी झालेल्या आहेत. त्यात अनेक तस्करी मारलेदेखील गेलेले आहेत. २०१५ झालेल्या चकमकीत जवळ जवळ २० तस्करांचा मृत्यू झाला होता.

चीनमध्ये काय आहे इतकी मागणी?

इसवी सन १४ व्या शतकापासून ते १७ व्या शतक्या मध्यापर्यंत मिंग राजघराणं होतं. त्या राजाला आणि तेथील शासकांना लाल चंदन खूपच प्रिय होतं. लाल चंदनाचं फर्निचर, संगीत वाद्य, सजावटीच्या वस्तू हे सगळं लाल चंदनापासून तयार करून घ्यायचं, हा जणू त्यांना छंद होता. ते जगातून उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक भागात असणार्‍या लाल चंदनाची मोठ्या प्रमाणात मागणी करत. त्यासाठी वाट्टेल ती किंमत ते मोजत. त्यामुळे लाल चंदनाची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु झाली.

जपानमध्ये लाल चंदनाची मागणी का होती?

जपानमध्ये शमिषेन संगीत वाद्य खूप प्रसिद्ध होतं. पारंपरिक कार्यक्रमात त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. हे वाद्य लाल चंदनापासून तयार केलं जात होतं. पण, काळानुसार जपानमधील ही संगीत वाद्य वाजविण्याची परंपरा कमी झाली, त्यामुळे जपानमध्ये सध्या मागणी घटली आहे; पण, सिंगापूर, युएई आणि ऑस्ट्रेलिया या देशातून लाल चंदनाला मोठी मागणी आहे. सध्या शेषाचलम जंगलातील लाल चंदनाची झाडं ५० टक्क्यांनी घटली आहेत.

हे वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news