पुणे : आईनेच मुलीला फेकलं कालव्यात अन् केला अपहरणाचा बनाव

पुणे : आईनेच मुलीला फेकलं कालव्यात अन् केला अपहरणाचा बनाव
Published on
Updated on

आळेफाटा, पुढारी वृत्तसेवा : वंशाला अजून एक दिवा हवा म्हणून पाचव्या अपत्याला जन्म दिला; पण पुन्हा मुलगीच झाल्याने जन्मदात्या आईनेच नवजात मुलीला पिंपळगाव कालव्यात फेकल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे. या धक्कादायक प्रकरणामध्ये पोलिसांनी संबंधित ३० वर्षीय परप्रांतीय महिलेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सुनीता नंदराम प्रजापती (वय ३०, रा. नाशिक रोड आळेफाटा) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळेफाटा येथे वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय सुनिता प्रजापती हिने शुक्रवारी (दि. ५) १५ दिवसांपूर्वी जन्मलेल्या  मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्‍याची तक्रार आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.  त्यानुसार पोलिसांनी तपासही सुरू केला. मात्र, महिलेकडून मिळालेली माहिती आणि तिच्या वागणे पोलिसांना संशयास्‍पद वाटू लागले. पोलिसांनी 'सीसीटीव्ही' फुटेज तपासले आणि तक्रारदार आईला शनिवारी ताब्यात घेतलं होते.

वंशाला हवा होता आणखी एका दिवा

पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पथकासमोर महिलेने कबुली दिली. तिने सांगितले की, पहिल्या तीन मुली तर चौथा मुलगा झाला होता.  वंशाला आणखी एक दिवा हवा म्हणून अजून एका अपत्याला जन्म दिला; पण पुन्हा मुलगीच झाली. आपणच आपल्या पोटच्या बाळाला पिंपळगाव जोगा कालव्यात फेकून दिले. या घटनेने आळेफाटा परिसरात एकच खळबळ उडाली होती. कालव्याला पाणी सुरू असताना ते अर्भक पाण्यात फेकले होते. महिलेने कबुली दिल्यानंतर कालव्याचे पाणी कमी करून ते शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून युद्ध पातळीवर केला जात आहे.

आळे, राजुरी, रानमळा, बेल्हा, आळकुटी, पारनेर भागातील कालव्यात किंवा पाण्याच्या चारीमध्ये कुणाला हिरव्या रंगाचे टी-शर्ट घातलेले आणि पिवळसर रंगाच्या शालीमध्ये गुंडाळलेले अर्भक आढळून आल्यास आळेफाटा पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. दरम्यान, रविवारी सकाळी आरोपी महिलेला प्रथमवर्ग न्यायालयात जुन्नर येथे हजर केले असता न्यायालयाने महिलेला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक रागिणी कराळे तपास करत आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news