

पुणे: मेट्रो आता सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सुरू राहणार आहे. पुणे मेट्रो आपली प्रवासी सेवा प्रवाशांच्या सोयीसाठी सकाळी १ तास लवकर सुरू करीत आहे. संबंधित बदल हा वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या मार्गावर लागू करण्यात आला आहे. संबंधित बदल दिनांक १७ ऑगस्ट २०२३ पासून लागू करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानकाच्या वेळेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या मार्गावरील सेवा सकाळी ७ ते रात्री १० अशीच सुरू असणार आहे. याची प्रवाश्यांनी नोंद घ्यावी
वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक मार्ग
सकाळी ६ ते ८ – दर १५ मिनिटांनी
सकाळी ८ ते ११ – दर १० मिनिटांनी
सकाळी ११ ते दुपारी ४ – दर १५ मिनिटांनी
दुपारी ४ ते रात्री ८ – दर १० मिनिटांनी
रात्री ८ ते १० – दर १५ मिनिटांनी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक मार्ग
सकाळी ७ ते ८ – दर १५ मिनिटांनी
सकाळी ८ ते ११ – दर १० मिनिटांनी
सकाळी ११ ते दुपारी ४ – दर १५ मिनिटांनी
दुपारी ४ ते रात्री ८ – दर १० मिनिटांनी
रात्री ८ ते १० – दर १५ मिनिटांनी
हेही वाचा: