

पुढारी ऑनलाईन: पुढारी ऑनलाईन: शिवसेनेचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांना पुणे न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे संजय शिरसाट यांच्याविरोधात पुणे कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. याच प्रकरणात शिरसाट यांना हे समन्स देण्यात आले आहे. या केसमध्ये सुषमा अंधारे यांनी 3 रुपयांच्या अब्रुनुकसानीची मागणी केली आहे.
आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमधील मेळाव्यात ठाकरे गटाच्या नेत्या सुषणा अंधारे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी महिला आयोगाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. सुषमा अंधारे या त्यांच्या अनेक सभेतून विरोधकांवर जहरी टीका करत असतात. अनेक भाषणात त्या आमदारांचा भाऊ म्हणून उल्लेख करतात. त्यावरुन संजय शिरसाट यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. परंतु यावेळी संभाजीनगरमध्ये बोलत असताना त्यांची जीभ घसरली होती.
दरम्यान सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याबाबत परळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, प्रकरण संभाजीनगर येथे घडल्याने परळी पोलिसांनी ते वर्ग केलं होतं. पोलीस तपासानंतर आता संजय शिरसाट यांना क्लीनचिट मिळाली असल्याचं वृत्त समोर आले.
हेही वाचा: