पुणे : ५० लाखांचा गांजा जप्त; सोलापूर महामार्गावर यवत पोलिसांची कारवाई

पुणे : ५० लाखांचा गांजा जप्त; सोलापूर महामार्गावर यवत पोलिसांची कारवाई
Published on: 
Updated on: 

यवत; पुढारी वृत्तसेवा : पुणे- सोलापूर महामार्गावर पाटस (ता.दौंड) येथे यवत पोलिसांनी गांजा तस्करी करणारी टोळी पकडून ५० लाखाचा गांजा जप्त केला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार यवत पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावर पाट्स गावाच्या हद्दीत आज (रविवार) मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास एक मालवाहतूक ट्रक ताब्यात घेतला. या ट्रकची तपासणी केली असता यात सुमारे 50 लाख रुपयांचा गांजा आढळून आला आहे.

यात जवळपास 10 पेक्षा जास्त आरोपींना यवत पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, रविवारी सकाळी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हा गांजा परराज्याततून पुणे जिल्ह्यातील काही दुकानात आणि मुंबईत विक्रीसाठी आणण्यात आला होता असा संशय पोलिसांना असून, यात जिल्ह्यातील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news