Prakash raj
Prakash raj

Prakash Raj: त्रिपुरा विधानसभेत अश्लील व्हिडिओ पाहणाऱ्या आमदारावर प्रकाश राजचे टीकास्त्र

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : त्रिपुरातील भाजप आमदार जादब लाल नाथ हे अश्लिल व्हिडिओ पाहतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्रिपुरा विधानसभेचे सत्र सुरु मागे बसून आमदार नाथ तो व्हिडिओ पाहत होते. (Prakash Raj) त्याचवेळी कुणीतरी मागून त्यांचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. आता या प्रकरणी साऊथ अभिनेते प्रकाश राज यांनी आपले मत व्यक्त करत नाथ यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. (Prakash Raj)

मीडिया रिपोर्ट्समुसार, जादब लाल नाथ यांचा हा व्हिडिओ सध्याचा असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडिओमध्ये नाथ मागे बसून फोनमध्ये काही तरी पाहताना दिसत आहे. याचदरम्यान कुण्या एका व्यक्तीने इंटरनेटवर व्हायरल केलं आहे. यानंतर सोशल मीडियावर धुमाकूळ पाहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हायरल व्हिडिओवर मशहूर अभिनेता प्रकाश राजने हा प्रकार लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे.

जादब लाल नाथ यांना विधानसभेत अश्लिल व्हिडिओ पाहणे भारी पडलं आहे. याप्रकरणी प्रकाश राजने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलंय, 'ब्लू जेपी. शेम.'

अभिनेता प्रकाश राजच्या या ट्विटवर युजर्सनेदेखील आमदाराची शाळा घेतली. एका युजरने कमेंट करत लिहिले की- 'यावर तर चित्रपट बनायला पाहिजे.' दुसऱ्या युजरने लिहिलं, 'अश्लिल व्हिडिओ पाहणारे आमचा देश चालवत आहेत. भविष्य तर …..' आणखी एका युजरने लिहिलं, 'वाह नेता जी जवानीचे दिवस परत आले आपले.'

दरम्यान, त्रिपुराचे भाजप अध्यक्ष राजीव भट्टाचार्य म्हणाले की, पक्षाकडून नोटिस जारी करण्यात आलीय. आणि याप्रकरणी स्पष्टीकरण मागितलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news