File Photo
Latest
आज ना उद्या अजित पवार मुख्यमंत्री होतीलच : प्रफुल्ल पटेल
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आज ना उद्या कधीतरी मुख्यमंत्री होतीलच, असा ठाम विश्वास व्यक्त केला असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला जोर आला आहे.
पटेल म्हणाले,अजित पवार हे महाराष्ट्राचे वजनदार आणि लोकप्रिय नेते आहेत. त्यांना कधी ना कधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची संधी मिळेलच, आम्हीही त्यासाठी काम करणार आहोत. मात्र, आज ती जागा रिकामी नाही, मग चर्चा कशाला करता? असा प्रश्न उपस्थित करून पटेल म्हणाले की, काम करणार्या माणसाला आज ना उद्या संधी मिळत असते.
हेही वाचा :
- Manipur Viral Video Case: मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची CBI करणार चौकशी
- iPhone : आयफोन घेण्यासाठी आईने 8 महिन्याच्या बाळाला विकले!
- Parliament Monsoon Session : मणिपूर मुद्यावरुन विरोधकांचा संसदेत प्रचंड गदारोळ

