

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी (Prahlad Modi) यांच्या कारला कर्नाटकातील म्हैसूरमध्ये अपघात झाला. म्हैसूर तालुक्यातील काडाकोलाजवळ आज (दि२७) झालेल्या अपघातात प्रल्हाद मोदी यांच्यासह त्यांचा नातू आणि सून गंभीर जखमी झाले आहेत.
प्रल्हाद मोदी (Prahlad Modi) त्यांच्या मर्सिडीज बेंझ कारने बंगळुरूहून बांदीपूरला जात होते. यावेळी त्यांचा मुलगा, सून आणि नातूही कारमध्ये होते. या अपघातात प्रल्हाद मोदी, त्यांची सून आणि नातू गंभीर जखमी झाले आहेत. मुलगा आणि चालक किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने म्हैसूरच्या जेएसएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. म्हैसूरच्या पोलीस अधीक्षक सीमा लाटकर तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
हेही वाचा :