

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मणिूपर हिंसाचारासंबंधी यूरोपीय यूनियन संसदेत चर्चा झाली. पंरतु, पंतप्रधानांनी हिंसाचारवर कुठलेही भाष्य केले नाही, यावर राहुल गांधी यांनी ट्विटरवरून टीका केली.
मणिपूर जळाले, यूरोपीय यूनियनच्या संसदेत भारताच्या अंतर्गत मुद्दयावर चर्चा करण्यात आली; पंतप्रधान मात्र गप्प आहेत, अशा शब्दात राहुल यांनी मोदींवर टीकास्त्र डागले. दरम्यान 'राफेल'ने मोदींना 'बेस्टिल डे' चे तिकिट मिळवून दिले, असा घणाघात त्यांनी केला.
यूरोपीय संघाच्या संसदेत मणिपूरमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचारासंबंधी भारतातील मानवाधिकाराच्या स्थितीवर गुरूवारी एक प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. अल्पसंख्यांक समाजाबद्दल असहिष्णुतेमुळे मणिपूरमध्ये अशी स्थिती निर्माण झाल्याचा आरोप प्रस्तावातून करण्यात आला होता. याच आधारे राहुल यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यावर तोंडसुख घेतले आहे.
विशेष म्हणजे शनिवारीच केंद्र सरकारने नौदलासाठी फ्रान्सकडून २६ नौदल राफेल फायटर जेट खरेदी करण्याच्या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. यानुसार नौदलास फ्रान्सच्या दसॉ एव्हिएशनकडून खास नौदलाच्या आवश्यकतेनूसार बनवण्यात आलेले २६ नवीन अद्ययावत राफेल फायटर जेट विमान मिळतील. पंरतू, याच डिलमुळे पंतप्रधानांना 'बेस्टिल डे' करीता बोलावण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
हेही वाचा :