विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाची नोटीस : ॲड. उज्ज्वल निकम म्‍हणाले… | पुढारी

विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाची नोटीस : ॲड. उज्ज्वल निकम म्‍हणाले...

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदार अपात्रतेसंदर्भातील निर्णय हा विधानसभा अध्यक्षांनी चौकशी करून घ्यावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने ११ मेरोजी दिले होते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी चौकशी सुरू केली का? काय पुरावे आहेत का ? याबाबत  खातरजमा करून घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना विचारणा केली असावी, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांनी आज (दि.१५) माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना नोटीस दिली, असे यात म्हणता येणार नाही. त्यांनी आमदारांच्या अपात्रतेविषयी पूर्ण चौकशी केली आहे की नाही, याविषयीची विचारणा केली असल्याचे निकम यांनी सांगितले.

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून यासंदर्भात विलंब होत असल्यामुळे विशिष्ट मुदतीत न्याय देण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणांमध्ये काय प्रगती झाली? या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने माहिती मागितलेली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या वक्तव्यावर मी काही बोलू शकत नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे काय म्हणणं आहे, ते तेच सांगू शकतात. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून विधानसभा अध्यक्षांना काय खुलासा द्यायचा आहे, याची विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे. दोन आठवड्याच्या संदर्भात उत्तर मागितले आहे.

हेही वाचा :

Back to top button