

पुढारी ऑनलाईन डेस्क : चार दिवसांचा अमेरिका दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तमधील कैरोला रवाना झाले आहेत. ते आजपासून दोन दिवस इजिप्तच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तत्पूर्वी, वॉशिंग्टनच्या रीगन सेंटरमध्ये पंतप्रधान मोदींनी डायस्पोरांना संबोधित करताना भारताच्या यशाची गणना केली. मोदी म्हणाले की, H-1B व्हिसाचे नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला अमेरिकेबाहेर जावे लागणार नाही. आता तुम्ही अमेरिकेत राहून H-1B व्हिसाचे नूतनीकरण करू शकता, असे सांगितले.
भारतीय डायस्पोराला संबोधित करताना पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, भारत लोकशाहीची जननी आहे आणि अमेरिका प्रगत लोकशाहीचा चॅम्पियन आहे. आज जग या दोन महान लोकशाहींमधील भागीदारी अधिक दृढ होताना पाहत आहे. अमेरिका हे आमचे सर्वात मोठे व्यापारी भागीदार आणि निर्यातीचे ठिकाण आहे. पण आमच्या भागीदारीची खरी क्षमता अजून समोर येणे बाकी आहे. भारतात शक्य तितकी गुंतवणूक करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. भारतातील Google चे AI संशोधन केंद्र 100 हून अधिक भाषांवर काम करेल. भारत सरकारच्या मदतीने, ह्यूस्टन विद्यापीठात येथे तामिळ अभ्यास चेअर स्थापित केले जाईल. गेल्या काही वर्षांत भारतात ज्या पद्धतीने डिजिटल क्रांती झाली आहे ती अभूतपूर्व आहे. भारताच्या या प्रचंड प्रगतीमागे देशातील १४० कोटी लोकांचा विश्वास आहे, असेही मोदी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :