PM Modi Bhutan Visit: PM मोदींच्या दौऱ्यानंतर भूतान पंतप्रधान म्हणाले ,’माझा भाऊ…’

PM Modi Bhutan Visit
PM Modi Bhutan Visit
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या दोन (२२ मार्च ते २३ मार्च) दिवसांपासून भूतान दौऱ्यावर होते. आज (दि.२३) त्यांच्या भूतान दौऱ्याची सांगता होऊन ते परत भारतात येण्यासाठी निघाले. दरम्यान भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोब्गे यांनी 'आम्हाला भेट दिल्याबद्दल माझे भाऊ पंतप्रधान मोदी यांचे खूप आभार' असे म्हणत पीएम मोदींचे आभार मानले आहेत. (PM Modi Bhutan Visit)

भूतान पंतप्रधानांकडूनही 'मोदी की गॅरंटी'चा उल्लेख

भूतान पंतप्रधान त्शेरिंग तोब्गे यांनी एक्स पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, पीएम मोदी यांचे व्यस्त वेळापत्रक किंवा खराब हवामान यापैकी एकही समस्या त्यांना आमची भेट घेण्याचे वचन पूर्ण करण्यापासून रोखू शकले नाही. हीच 'मोदी की गॅरंटी' ची (#ModiKaGuarantee) घटना आहे," असेही भूतानच्या पंतप्रधानांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. (PM Modi Bhutan Visit)

PM मोदींचा भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मान

पंतप्रधान मोदींना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाल्याबद्दल, भूतानचे पंतप्रधान दाशो त्शेरिंग तोबगे म्हणाले, 'संपूर्ण देशाच्या वतीने, सर्व भूतानी लोकांच्या वतीने, मी पंतप्रधान मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करू इच्छितो. पंतप्रधान मोदींनी भूतानला भेट दिल्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. व्यस्त वेळापत्रक असूनही त्यांनी भूतानला भेट दिली. हवामानामुळे आम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागला, परंतु जेव्हा परिस्थिती अनुकूल होती तेव्हा पंतप्रधान मोदी हा सन्मान स्वीकारण्यासाठी स्वत: पोहोचले. त्यांच्या दौऱ्याबाबत भूतानमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news