Pune Legislative Council Seat Dispute: अजित पवार असते तर भाजपची हिंमत झाली नसती; योगेश बहलांच्या वक्तव्याने महायुतीत खळबळ

पुणे विधान परिषदेच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीत तणावाची चर्चा; पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण तापले
Yogesh Bahal
Yogesh BahalPudhari
Published on
Updated on

पिंपरी: अजितदादा हयात असते, तर भाजपने पुणे विधान परिषदेवर हक्क दाखवण्याची हिंमत केली नसती, असे खळबळजनक वक्तव्य अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आणि विधान परिषद लढण्यास इच्छुक असणारे योगेश बहल यांनी मंगळवारी केले आहे. त्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

Yogesh Bahal
Pavana Closed Pipeline Project: पवना बंद जलवाहिनी प्रकल्प 15 वर्षांपासून रखडलेला; 171 कोटी खर्च करूनही शहराला पाणी नाही

पुणे विधान परिषदेच्या जागेवरुन महायुतीत तिढा निर्माण होणार नाही, असा दावा दोन्ही बाजूंनी केला जात असला तरी योगेश बहलांच्या वक्तव्यामुळे राजकीय पडद्यामागे रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.

Yogesh Bahal
Pimpri Chinchwad SRA Scam: मिलिंदनगर एसआरएमध्ये कोट्यवधींच्या टीडीआरचा खेळ? नियम धाब्यावर बसवून बिल्डरला लाभ

अनेक वर्षांपासून पुणे जिल्हा काबीज करुन पवार कुटुंबीयांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे भाजपचे मनुसबे आहेत. प्रत्येक निवडणुकीत या-ना त्या कारणाने भाजप हा मनसुबा पूर्ण करण्याच्यादृष्टीने पावले टाकत आहे. पुणे विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने योगेश बहलांनी या राजकीय वास्तवाकडे अप्रत्यक्षपणे बोट दाखवल्याचे बोलले जात आहे.

Yogesh Bahal
PCMC Cost Cutting Measures: पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोठा निर्णय; परदेश दौरे रद्द, खर्च कपातीचे कठोर आदेश

भाजप-राष्ट्रवादीत खटके उडण्याची शक्यता

अजितदादांच्या तुलनेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या नवख्या आहेत. भाजपकडून त्यांचा फायदा घेऊन, दबावतंत्राचे राजकारण खेळले जात आहे. कदाचित भाजपाचा असा प्रयत्न असू शकतो, हे नाकारता येणार नाही, असे म्हणत योगेश बहल यांनी नव्या राजकीय चर्चेला हवा दिली आहे. मात्र, असे असले तरी सुनेत्रा पवार खंबीर आहेत.

Yogesh Bahal
Maval Water Conservation Scheme: उर्से मावळमध्ये ‘एल निनो’चा धोका; जलतारा योजनेवर प्रशासनाचा भर

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक व सदस्य संख्या सर्वांधिक आहे. सुनेत्रा पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत आहेत. त्या पुणे विधान परिषदेची आमच्या हक्काची जागा राष्ट्रवादीलाच मिळवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, योगेश बहल यांच्या या वक्तव्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधात असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीत खटके उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news