Wadgaon Maval Voting: मतदान कक्षातच पूजाअर्चा! नगराध्यक्ष पदाच्या भाजप-राष्ट्रवादी उमेदवारांवर गुन्हा दाखल; वडगाव मावळात आचारसंहितेचा भंग

ॲड. मृणाल म्हाळसकर, अबोली ढोरे आणि माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे अडचणीत; 'परमार्थिक दूषणा'सह लोकप्रतिनिधी कायद्यानुसार गुन्हा दाखल.
Wadgaon Maval Voting
Wadgaon Maval Voting
Published on
Updated on

वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मतदान प्रक्रियेच्या सुरुवातीला मतदान केंद्रामध्ये येऊन मतदान यंत्रा कक्षाची पूजाअर्चा करून आचारसंहितेचा भंग व परमार्थिक दूषणाचा विषय निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी नगराध्यक्ष पदाच्या भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांसह माजी नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल केला आहे.

Wadgaon Maval Voting
PCMC Voter List Objections: मतदार याद्यांवर गोंधळ! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे तब्बल ६,८८७ आक्षेप, अनेक इच्छुकांची नावेच गायब

भाजपच्या उमेदवार ॲड.मृणाल गुलाबराव म्हाळसकर, राष्ट्रवादीच्या उमेदवार अबोली मयुर ढोरे व माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे या तीन जणांवर गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी मतदान केंद्राध्यक्ष नवनाथ दळवी व भागवत झांबरे यांनी फिर्याद दिली आहे.

Wadgaon Maval Voting
Mohan Bhagwat Rashtramandir Pune: "राममंदिर झाले; आता राष्ट्रमंदिर!" डॉ. मोहन भागवत यांचे पुण्यातून मोठे आवाहन

पोलिस निरीक्षक अभिजीत देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज वडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी शहरातील २४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. यापैकी रमेशकुमार साहनी इंग्लिश स्कूलमध्ये असलेल्या प्रभाग क्रमांक ६ व प्रभाग क्रमांक ८ या दोन मतदान केंद्रांमध्ये जाऊन मतदान केंद्राध्यक्ष दळवी व भागवत यांनी मज्जाव केला असताना मृणाल म्हाळसकर, अबोली ढोरे व मयुर ढोरे यांनी दोन्ही प्रभागाच्या मतदान केंद्रातील मतदान कक्षाची पूजाअर्चा केली.

Wadgaon Maval Voting
Ramdas Athawale Pimpri Alliance: "जास्त जागा न दिल्यास भाजपा सोडून राष्ट्रवादीसोबत जा!" आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांचा पदाधिकाऱ्यांना 'पॉवरफुल' सल्ला

त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला असून परमार्थिक दूषणाचा विषय निर्माण होईल असे कृत्य करण्यात आले आहे. त्यानुसार तिघांनावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम-२२१, २२३, १७१(ब) सह लोक प्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३०, १३१, १३२ प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद देण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कैलास कदम व पोलिस उपनिरीक्षक उमेश जाधवराव हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news