Vadgaon Maval Police Investigation: वडगाव मावळ पोलिसांची तत्परता; हरवलेली सोन्याची चैन काही तासांत परत

सीसीटीव्ही व डिजिटल व्यवहारांच्या आधारे शोध; पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक
Vadgaon Maval Police Investigation
Vadgaon Maval Police InvestigationPudhari
Published on
Updated on

वडगाव मावळ: बाजारपेठेत रस्त्याने जाताना हरवलेली अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पेमेंटच्या आधारे कार्यकुशलता दाखवत वडगाव मावळ पोलिसांनी मसुतावरून स्वर्ग गाठावाफ, अशी तपासाची दिशा फिरवत काही तासांत सबंधित महिलेला पुन्हा सोन्याची चैन पुन्हा मिळवून दिली. वडगाव मावळ पोलिसांच्या या कार्यकुशलतेचे विशेष कौतूक होत आहे.

Vadgaon Maval Police Investigation
Pimpri Construction Damage Footpaths: पिंपरीत बांधकामांमुळे पदपथ व सायकल ट्रॅक उद्ध्वस्त; नागरिक संतप्त

याबाबतची हकीकत अशी, की पौड (ता. मुळशी) येथील परमेश्वर पांडुरंग पवार (वय 35 रा. पौड, ता. मुळशी) हे आपल्या पत्नीसह वडगाव मावळ येथे नातेवाईकांकडे आले होते. खरेदीसाठी दोघे वडगाव बाजारात गेले असताना येथील पोटोबा महाराज मंदिर परिसरात त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन्याची चैन हरवली. ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ वडगाव मावळ पोलिस ठाण्यात धाव घेतली.

Vadgaon Maval Police Investigation
Pimpri LPG Shortage: पिंपरीत एलपीजी गॅसचा तुटवडा; इंडक्शन स्टोव्हला वाढती मागणी

सीसीटीव्ही फुटेज तपासणी

पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार डोईजड, सहायक पोलिस फौजदार अजित ननावरे, आशिष काळे, पोलिस शिपाई विठ्ठल पतुरे, किरण ढोले, देविदास भांगे, प्रुफल्ल गोरे, प्रतीक राक्षे, सागर ढमाले या पथकाने तात्काळ घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान मंदिरासमोरील केळी विक्रेत्याच्या गाड्याजवळ रस्त्यावर पडलेली चैन एका महिलेला सापडल्याचे दिसून आले. संबंधित महिलेने चैन उचलल्यानंतर तेथून केळी खरेदी करताना स्कॅनरद्वारे डिजिटल पेमेंट केल्याचेही फुटेजमध्ये स्पष्ट झाले.

Vadgaon Maval Police Investigation
Pimpri Property Tax Recovery: पिंपरीत मालमत्ता कर वसुलीसाठी आक्रमक मोहीम; थकबाकीदारांची नावे जाहीर

महिलेची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी हुशारीने केळी विक्रेत्याकडील स्कॅनरचे व्यवहार तपासले. त्या वेळेतील व्यवहारांची माहिती मिळवून संबंधित बँक खात्याचा तपशील काढण्यात आला. त्यातून संबंधित महिला राजगुरुनगर (ता. खेड) येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ तिच्याशी संपर्क साधला असता तिने प्रामाणिकपणे चैन सापडल्याची कबुली देत ती पोलिसांच्या स्वाधीन केली. त्यानंतर पोलिसांनी ही सोन्याची चैन परमेश्वर पवार यांच्या पत्नीला परत दिली. पोलिसांच्या या जलद आणि तांत्रिक तपासामुळे हरवलेली चैन काही तासांत मिळाल्याने पवार कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. या संपूर्ण कारवाईत पारंपरिक तपासाबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला.

Vadgaon Maval Police Investigation
Pimpri Gudi Padwa Shopping: गुढीपाडव्याच्या खरेदीने पिंपरी-चिंचवडच्या बाजारपेठा गजबजल्या

वरिष्ठ अधिकारी, व्यापारी, नागरिकांकडून पोलिसांचे कौतूक

सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल व्यवहारांचा बारकाईने अभ्यास करून पोलिसांनी मसुतावरून स्वर्ग गाठावाफ अशी तपासाची दिशा घेतली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुणे ग््राामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांनी संबंधित पोलिसांचे अभिनंदन करून त्यांना प्रशस्तिपत्रक बहाल केले. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडूनही पोलिसांच्या तत्परतेचे आणि कौशल्यपूर्ण तपासाचे विशेष कौतूक करण्यात आले. या घटनेमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news