Pimpri drowning news: मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू

अवघ्या दोन दिवसांपूर्वी तयार केलेल्या आठ फूट खोल शेततळ्यात उतरले; पाणी सोडल्याच्या पहिल्याच दिवशी घडली दुर्घटना
Drown News
Drown NewsPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: घराजवळील शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या मामा-भाच्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबीयांनी दोघांना पाण्याबाहेर काढून तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना बुधवारी (दि. २५) सायंकाळी सातच्या सुमारास मोशी येथील बनकरवस्ती येथे घडली.

सिद्धांत उत्तम लगाडे (वय २१) आणि रितेश रमेश ताकपेरे (१२, दोघेही रा. बनकरवस्ती, मोशी) अशी मृत्युमुखी पडलेल्या मामा-भाच्याची नावे आहेत. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Drown News
Sant Bhagwanbaba Multistate Credit Society: भगवानबाबा मल्टिस्टेटवर अवसायक नेमा; खातेधारकांची मागणी

पोलिस निरीक्षक भोजराज मिसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धांत हा रितेशचा मामा होता. बुधवारी दोघेही घराजवळ असलेल्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना दोघेही पाण्यात बुडाले. याबाबत माहिती मिळताच कुटुंबीयांनी शेततळ्याकडे धाव घेतली.

दोघांना पाण्याबाहेर काढून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी दोघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे जाहीर केले. एकाच घटनेत कुटुंबात दोन सदस्यांचा मृत्यू झाला. अवघ्या बारा वर्षांच्या रितेशसह तरुण सिद्धांतचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

Drown News
PCMC Sports Teachers: महापालिकेच्या १०५ शाळांसाठी केवळ आठ क्रीडाशिक्षक; विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना खीळ!

दोघांनाही पोहता येत नव्हते

सिद्धांत आणि रितेश या दोघांनाही पोहता येत नव्हते. असे असतानाही दोघे घराजवळील शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले होते. दरम्यान, पाण्यात उतरल्यानंतर दोघेही बुडाले. कुटुंबीयांना याबाबत माहिती मिळेपर्यंत बराच उशीर झाला होता.

नव्याने तयार केलेले शेततळे जीवघेणे

घटनास्थळी असलेले आठ फूट खोल शेततळे अवघ्या दोन दिवसांपूर्वीच तयार करण्यात आले होते. घटनेच्या दिवशीच या शेततळ्यात पाणी सोडण्यात आले होते. मात्र, पहिल्याच दिवशी हे शेततळे मामा-भाच्यासाठी जीवघेणे ठरल्याने शोक व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.