PCMC Sports Teachers: महापालिकेच्या १०५ शाळांसाठी केवळ आठ क्रीडाशिक्षक; विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना खीळ!

दापोडी, कासारवाडी, फुगेवाडीत क्रीडाशिक्षकांची वानवा; क्रीडा साहित्याचाही अभाव, आठ दिवसांत नियुक्तीचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन
Sports
SportsPudhari
Published on: 
Updated on: 

दापोडी: महापालिकेच्या सर्व शाळा स्मार्ट, डिजिटल होत असताना क्रीडा विभागाकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या १०५ शाळांमध्ये केवळ आठच क्रीडा शिक्षक आहेत. क्रीडा साहित्यही उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना खेळापासून वंचित राहावे लागत आहे. महापालिकेच्या विविध शाळांमध्ये क्रीडा, संगणक आणि कलाशिक्षकांची वानवा असल्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आणि क्रीडाकौशल्यावर परिणाम होत असल्याचे चित्र समोर आले आहे. विशेषतः दापोडी, कासारवाडी आणि फुगेवाडी परिसरातील महापालिका शाळांमध्ये क्रीडाशिक्षकच नाहीत. गोरगरीब घरातील विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.

Sports
Pimpri Chinchwad TB Cases: पिंपरी-चिंचवडमध्ये क्षयरोगाचा विळखा कायम; यंदा २,५२८ रुग्णांची नोंद

शाळेत अधिक पटसंख्या असल्याशिवाय क्रीडाशिक्षकाची नेमणूक करता येत नसल्याचा नियम राज्य शिक्षण प्रशासनाने शिथिल करावा, अशी मागणी शाळांच्या मुख्याध्यापकांकडून करण्यात येत आहे. दापोडीतील शहीद अशफाकउल्ला खान उर्दू शाळेत पहिली ते आठवीपर्यंत एकूण २२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ज्यात ११३ मुले आणि ९६ मुलींचा समावेश आहे. या शाळेत संगणक उपलब्ध असले तरी क्रीडाशिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या मैदानी खेळांच्या प्रशिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशीच काहीशी अवस्था फुगेवाडी येथील महापालिका शाळेची असून, तेथे २१२ पटसंख्या आहे. शाळेत विविध उपक्रम राबवले जातात. मात्र, क्रीडाशिक्षकाअभावी विद्यार्थ्यांना खेळाचे योग्य धडे मिळत नाहीत.

Sports
Akurdi Railway Station: 'मेरा मोबाईल, मेरा रिचार्ज, मेरी रील... मेरी मर्जी!'; आकुर्डी रेल्वे स्थानकात मद्यधुंद व्यक्तीचा फिल्मी तमाशा

कासारवाडीतील महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेचीही हीच व्यथा आहे. ही एक उपक्रमशील शाळा असून, येथे बालवाडीत ८३, तर प्राथमिक विभागात एकूण २४० (१२७ मुले व ११३ मुली) पटसंख्या आहे. या शाळेत एका शिक्षकाची कमतरता भासत आहे. तसेच, कासारवाडी माध्यमिक शाळेचा पट ८६ असून, त्यात ५३ मुले व ३४ मुली शिक्षण घेत आहेत. परिसरातील विद्यार्थ्यांसोबतच डुडुळगाव येथील विद्यार्थीही येथे ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत आहेत. या सर्व शाळांमधून क्रीडा, कला आणि संगणक शिक्षकांची मागणी वारंवार करण्यात येत आहे. क्रीडाशिक्षक नसल्याची शाळेतील अनेक खेळाडू विद्यार्थ्यांनी खंत व्यक्त केली आहे. योग्य मार्गदर्शनाअभावी या भागातून तयार होणाऱ्या राष्ट्रीय खेळाडूंची संख्या घटली असून, विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी किमान अनुभवी क्रीडाशिक्षक असावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Sports
Ration Card Aadhaar Linking: रेशनकार्डच्या कामासाठी निगडीत नागरिकांचे हेलपाटे; आधारमधील त्रुटींमुळे प्रक्रिया रखडली

अटी व नियम शिथिल करण्याची गरज

राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यादेशानुसार असलेल्या पटसंख्या नियम धोरणात शिथिलता यावी, असे मत मुख्याध्यापकांनी व्यक्त केले. तसेच, प्रत्येक शाळेला कायमस्वरूपी क्रीडाशिक्षक देणे शक्य नसल्यास प्रशासनाने किमान आठवड्यातील दोन-दोन दिवस आळीपाळीने प्रत्येक शाळेसाठी क्रीडाशिक्षक उपलब्ध करून द्यावेत. शाळेतील सध्याचे इतर विषयांचे शिक्षक क्रीडा तास घेऊ शकतात, परंतु खेळातील बारकावे आणि तांत्रिक शिक्षण केवळ प्रशिक्षित क्रीडाशिक्षकच देऊ शकतात. त्यामुळे क्रीडाक्षेत्रात नवे खेळाडू घडवायचे असतील आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव द्यायचा असेल तर प्रशासनाने अटी व नियम शिथिल करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

Sports
Pimpri Chinchwad Encroachment Removal: पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडणार; अतिक्रमणे हटविण्याचे आयुक्तांचे आदेश

परिसरातील शाळांची पाहणी केली जाईल. क्रीडाशिक्षक नसलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांशी व महापालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून क्रीडाशिक्षकांचा प्रश्न मार्गी लावला जाईल. विद्यार्थ्यांना क्रीडांगण व क्रीडा शिक्षकांची सोय केली जाईल.

संजय काटे, अध्यक्ष, शहर सुधारणा समिती, महापालिका

पालिकांच्या शाळांमध्ये गोरगरिबांची मुले शिक्षण घेत आहेत. त्या शाळांमध्ये जर क्रीडाशिक्षक नसतील तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू कसे निर्माण होणार हा मोठा गंभीर प्रश्न आहे. संबंधित प्रशासनाने प्रत्येक शाळेमध्ये क्रीडाशिक्षकांची नेमणूक करावी.

मोरे दिनेश, दापोडी

क्रीडाशिक्षकांच्या नेमणुकीसाठी संबंधित एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. त्या एजन्सीमार्फत येत्या आठ दिवसांच्या आत संबंधित क्रीडाशिक्षकांची नेमणूक करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.

संगीता बांगर, शिक्षणाधिकारी, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.